Sunday, June 27, 2010

२८/६/2010

आज सकाळी सकाळी खुप घाई झाली, सचिन चा फ़ोन आला न बोलता बोलता वेळ कसा संपला ते कळलेच नाही। चालायचेच। काल खुप टेंशन होते॰ , नितिन पण मृणाल वर चिडलेला न सचिन ने पण राजीनामा द्यायचा निर्णय घेतलेला। पण कालच किशोरशी बोलले न रीलाक्स झाले होते.मृणाल रविवारी येते आहे, न सचिन थाबंतो आहे थोड़े दिवस.चला काय होइल ते पाहण्या शिवाय माझ्या हातात काय आहे.मुले मोठी झाली त्यांचे ते निर्णय घेऊ लागली १ प्रकारे समाधान आहे पण आता मुलाना आपली गरज नहीं हे ही कुठे तरी मानत येते पण माला खरच नाही वाइट वाटत या गोष्टीचे। ते तेवढे सक्षम झाले म्हणजे मी निवांत झाले न? असे तर होणारच त्यांचा संसार चालू झाला की तेच निर्णय घेणार न, उलट त्यानीच निर्णय घेणे महत्वाचे आहे.जरा शांत पणे विचार केला की हे सरे पटायला लगते। मी आता बाजूला होणे च योग्य आहे.बस आज बस करते.

Wednesday, June 2, 2010

३/६/10

किती दिवसानी लिहिते आहे आज पण वेळ होत नहीं न जेव्हा वेळ आसतो तेव्हा लिहायला जमात नहीं आजही कही लिहायला लगे पर्यंत कोणी तरी येइल न लिहिणे तसेच राहिल असे होते बरेच वेळा आयुष्यात खुप वेळा आसा आनुभव येत आसतो की आपण ठरवतो काही न होते काही.काही का आसेना २ वाक्य तरी लिहायची ठरवूनही नाही जमले लिहायला अर्थात त्यालाही आपणच कारण आसतो, आगदी मनापासून ठरवले तर नक्की हे जमले आसते आपला आळशीपणा नडतो म्हणा न आसे किती तरी प्रसंग आसतात की आपण ठरवले आसते तर नक्की जमले आसते.पण त्या गोष्टीची तेव्हढ़ी निकड नहीं भासत माणसाला ज्याची निकड भासते ते माणूस जिव तोडून करतोच करतो हे लिहिणे पण तसे आहे त्या वाचून तसे कही बिघडत नाही हा जरा मनाला आस्वस्थ वाटते पण असे अस्वस्थपणा मनाआड़ टाकायची सवय झाली आहे। आली वेळ सपादुन न्यायची न चालायला लागायचे.पण आता बस फार वेळ नहीं चालणार हे, कुठे तरी आपल्या मनचा विचार करून त्या प्रमाणे चालायला पाहिजे.

Thursday, May 20, 2010

२१/५/10

आज सकाळी सकाळी नितिन ने टी व्ही लावला, आनंद सिनेमा लागला होता, त्याने तो तासाचा चालू ठेवला.मला आनंद सिनेमा आवडतो हे त्याला माहित आहे.किती वर्ष झाली मी तो पाहत आले आहे.मी ११ वि ला होते तेव्हा खास सिनेमा बघण्यासाठी म्हणून गेलेले होते, सोलापूरला ते दिवस असेच कुठे तरी गुन्तण्याचे होते.३५ वर्ष झाली पण आजुनही त्या सिनेमातली गोडी कमी झालेली नाही, तसे त्यातले संवाद तेव्हाही पाठ होते आताही न बघता ते आठवतात, पण त्याचा कन्टाळा नाही येत। मास्टर पिस म्हणतो तसा आहे तो .खरेच असे आयुष्य कोणी तरी नक्की जगले आसेल.आयुषाची आवघी काही महीने राहिलेले न हसतमुख आपला काहीही संबध नसलेल्या लोकात त्यानाच्यासथी न त्यांच्या बरोबर जगायचे खरेच परीक्षा आहे टी। पण रोजचे आयुष्य आस्ते असेच लम्ब्लाचक तर इतक्य उत्कात्तेने जगु शक्ल आस्ता का? माला हा नेहमी पद्नारा प्रश्न आहे। घर उभे करायचे न तय घरातील मांसना उभे करण्यासाठी धड्पदय्चे असे वाट्याला आले आस्ते तर आनंद इतका हसतमुख रहू शक्ल आस्ता। उद्याची कलजी त्याला नवति म्हणून तो इतका आंदी न हसत रहू शक्ल.आपण पण असे उद्याची कलजी सोडून जगु शकू का? खुप वेला प्रयत्न करते पण टी सवय लागली की आस्लेल्यातिल चिमुटभर उद्यासाठी किव दुसर्यासाठी काढून ठेवायचे मग उदय जर विसरता येत नहीं तर ते आयुष जगता येइल का? पण आत्ता टी गरज आहे, सगळी चिंता सिडून आत्ताचा शकन जगण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे.पहु जमेल का ते.

Sunday, April 11, 2010

१२/४/10

फोटो उपलोड करायचा प्रयत्न करत होते पण नहीं जमात आहे, आता मेधालाच विचारेन महिला दिन निमित्त्य मी काय बोलले ते विचारत होती ऑफिस मधे महिला दिन निमित्त्य कार्यक्रम होता, सगळ्या बयकानाच बोलावले होते विषय होता, मी न माझे कार्यालय, मी न माझे कुटुम्बा, मी न माझे आरोग्य। बोलणारी प्रतेकजण महिला दिन निमित्य शुभेच्छा देत होत्या , का आपणच आपल्याला शुभेच्छा घ्यायच्या? माझा पहिला दावा हा होता, जे कही आम्ही बोलणार ते ऐकायला कोणी पुरुष नकोत? माझे कार्यालय बाबत मी बोलले पण मी तर पूर्णपणे field duty केली, मला कार्यालय आसे नव्हतेच ते सांगितले, की बाहेर बरोबरीने काम करणारे पुरुषच विश्वास ठेउन साथ देतात न? बाकी समजापसून कही त्रास होऊ नये म्हणून ते सोबत करतात न? तसेच रोजच्या जीवनात सुध्या आपल्याला सुटका हावी आसते ती पुरुषांपसून नहीं तर पुरुषीपणाच्या दृष्टिकोना पासून.तो बदलला की खुप गोष्टी बदलतात, शेवटी एकमेकाना सोबत तर हावी आसतेच मग समजून घेउन जर ती सोबत केली तर आयुष्य जास्त सुखाचे होते। आपल्याकडे, आर्ध नट नारेश्वरी ही एक कल्पना आहे ती प्रतेकासठी लागू होणारी आहे, कारण त्याशिवाय एकमेकाना पूर्णत्व नाहीच आहे। आपल्याला बायकांचा सुध्या दृष्टिकोण बदलला पाहिजे, रोजच्या चाकोरीतून न जाता एखादी जरा हटके जात आसेल तर एकदम तिला वाइट नहीं ठरवले पाहिजे.या देवी सर्व भूतेशु आशी एक प्रार्थना आपल्याकडे आहे, त्यात सर्व देविना आवाहन केलेले आहे, धन देवता, भूदेवी, विद्या देवी शक्ति , भक्ति .त्यात एक देवी ठेवायची,manegment ची देवी, जे कम स्त्री वर्षानु वर्ष करत आलेली आहे, त्यामुळे समाज स्थीर आहे, मुले बाळे व्यवस्थीत राहतात, घराचे घरपण टिकून राहते, स्त्री घराबाहेर पडली पण तिने तिची मनेजमेंट नहीं सोडली, ती घराबरोबर ऑफिस च ही कारभार पाहू लागली। स्त्री विचरने बदलली पाहिजे तरच सरे बदलू शकते। खरे तर महिला दिन हा वेगळा साजरा करण्याची गरजच नहीं भासली पाहिजे। ती समजबरोबर समरसून गेली की त्याना वेगळेपण देण्याची काय गरज? ती म्हणजे सुख मिलण्याचे साधन ही संकल्पनाच बदलली पाहिजे। आसे कही बही बोलले सोमोरच्या बयकाना ते पटले आसवे कदाचित म्हणून फोटो न सरे सोपस्कार झाले आसवेत.

Thursday, April 8, 2010

९/४/10

आरोग्य पत्रिकेत महिला दिन निमित्त्य भाषण करतानाचा फोटो आला सगळीकडे कौतुक झाले, अंक घरी नेला पण घरात नहीं दखावणे झाले कोणी तो अंक ऊघडून नहीं बघणार माला माहित आहे तेवढ़ा इंटेरेस्ट कोणालाच नसणार आहे॰ भाषण छान झाले होते हे माला माहित आहे पण त्या गोष्टींचा रोजच्या जीवनात कही फायदा आसतो का? किती तरी गोष्टी, ऊस्फुर्त पणे घडतात, पण आसा चान्स किती वेळा मिळतो, सरकारी नोकरी इथे कशाला कही वाव नहीं, न मग डोके पण कम करेनसे होते। अता या नोकरीचा पण कंटाळा यायला लागला आहे॰ पण आणखी ५ वर्षे करणे भाग आहे॰ पाहू यात कसे कसे जमते ते॰ वेळ सम्भाळायची, बस जबाबदारी आहे म्हणून काम करायचे॰ मानसिक समाधान या नोकरीत कधीच नहीं वाट्याला आले॰ माला माहित आहे की या नोकरी मुळे मी न मुले निटपणे रहू शकलो, मुले शिकू शकली तरीही हे समाधान नहीं ते नाहीच बस पाट्या टाकणे चालू आसते माझे, आले ते काम करायचे दिवसाचे ८ तस पूर्ण झाले की आजचा दिवस संपला म्हणायचे न बाजूला सरकायचे॰ आता आयुषात पण आसेच आहे, जबाबदारी संपली, आपली कोणाला गरज नहीं राहिली, माझी मुले मझ्याशी नाहीत तशी वागत पण माझ्या मनातून या गोष्टी जात नाहीत, कदाचित जोड़ीदार आसता तर हे इतके नसते जाणवले, पण आसे वाटते की आयुष्यातली ५२ वर्षा संपली पुढची संपतील का? असे विचार सुरु झाले की मन अस्वस्थ होते, कही तरी चुकाते आहे असे वाटत रहते, जोड़ीदार नसणे हा माझा आपराध नहीं पण त्यामुळे येणारे वैफल्य नहीं न संपत॰ तरी या विचारांकडे नहीं मी मनाला जाऊ देत, तरीही कधीतरी तो विषय डोक्यात येतोच, आजही तसेच आहे मनाला सावरले पाहिजे यावर दूसरा कही इलाज नहीं ,बस आज इतकेच.

Tuesday, April 6, 2010

७/४/10

आज सकाळी चालत येताना दोन लहान मुले एकमेकाच्या गळ्यात गळा घालून रस्त्याने जात होते मस्त त्यांच्या त्यांच्या विश्वात रममाण झालेले कशाकडे लक्ष नव्हते मला माझे लहानपण आठवले, किती मस्त काळ आसतो न तो, मैत्रिणीशी भंआड़ायाचे तरी सकाळ झाली की तिची आठवण येणारच, मग कही तरी कारण काढून तिच्याकडे जयाचे, ती ही आपल्या सारखीच आस्वस्थ झालेली आसयची एक्मेकीना पाहिले की कालचे भांडण विसरले जायचे न एक्मेकीची ओढ़ जास्त जाणवायची ते दिवस वेग्ळेच होते, आभ्यासाचे बर्डन नव्हते, बस पास होताहेत न मुले आसे म्हटले जायचे। खेळायसाठी घराला आंगन आसायचे न आई वडीलाना कही बोलायचे आसले की आमची रवानगी अज्जाद त्या आंगणात खेळायला व्हायची मी तर सगळे खेळ खेळायची आगदी गोट्या, आंब्याच्या कोई, चोर पोलिस, डबा येसपैस, कसा वेळ संपायचा हे समजायचे नहीं माझ्या आयुषात मी आभ्यासा साठी कधी नहीं मर खाल्ला पण खेळून घरी ऊशीरा आले म्हणून खुपदा शिक्षा भोगली आहे.आज त्या दोन मुलाना पाहिले न ते दिवस आठवले, कही काळ का होईना सरे टेंशन विसरून त्या क्षणात जाऊन पोहचले.त्यानंतर खुप जबाबदार्या कदाचित आयुषात येणार आसतील म्हणून तो तसा बिनधास्त काळ वाट्याला आला असावा.

७/४/१०