Tuesday, September 28, 2010

२९/९/10

खरे तर आज लिहिन असे नव्हते ठरवले पण वेळ मिळाला न मुख्य म्हणजे लिहावेसे वाटले काल सहज "लागा चुनरी मैं दाग" हे गाणे आठवले न आज सकाळी ते रेडिओ वर लागले इतका आनंद झाला कारण ते गाणे ऐकावे असे वाटत आसताना गाणे ऐकायला मिळणे म्हणजे आपण इच्छा करणे न लगेच ती गोष्ट आपल्याला मिळाली की खूप बरे वाटते॰ खरे तर आयुषाची ५० वर्ष संपली आता पण तरीही लहान मुलान प्रमाणे आनंद हा होतच आसतो कुठे तरी त्या भावना मनामध्ये आसतात॰ असे बरेच वेळा घडते की अखाद्याची आपण आठवण काढत आसतो न ती व्यक्ति भेटते तरी नसता त्या व्यक्तीचा फ़ोन येतो हे का घडते याला उत्तर नहीं पण मनाच्या गाभ्या पासून एखादी गोष्ट आपण कधी मागितली तर ती मिळते पण त्या साठी हेतू चांगला पाहिजे॰ हा आनुभव बरेच जाणांना येत आसेल हे निश्चित॰ मी पण हे खुपदा आनुभवते, न मग असे कुठेतरी ते सांगितले पण जाते॰ चला आज बस आता कमला लगावे कसे.

Sunday, September 26, 2010

२७/९/10

काल सगळंयाना दिवाळीसाठी बोलिवण्यासठी पत्र लिहिली खूप दिवसानी अशी पत्र लिहिण्याचा योग आला नसता जे कही बोलणे ते फ़ोन वरून होते मग ती लिहिण्याची मजा नहीं चाखता येत॰ असे घडले त्यामुळे माणसे जवळ अली की लाम्ब गेली हे नहीं सांगता येणार॰ फ़ोन वर आपण आगदी मनातले कधी बोलतो का? का? कशी? असे प्रश्न विचारले जातात पण मनाच्या गभ्यातुन आलेली साद त्या पत्रातच मिळते असे माला वाटते हा॰ शेवटी हा ज्याच्या त्याच्या भावनांचा प्रश्न आहे॰ मला आवडलेली गोष्ट दुस्र्याला आवडेलच असे नहीं॰ तर पत्रा वरून aathvale की माणसे संवाद sadhtana फ़ोन मुळे जवळ अली की लाम्ब गेली फ़ोन mule लगेच त्या क्षणाला साद घालता येते न त्याला प्रतिसाद पण लगेच मिळतो तरीही पत्र लिहिताना मनानी दिलेला आपुलकीचा mulama त्या पत्रातून जाणवतो। फोन आला न माणूस लिहिण्याचे कष्ट घेईना झाला॰ आज काही लिहिता नहीं येणार असे वाटते आहे शब्द lavkar nahit umtat ahet computer वर किती या गोष्टींच्या आधीन होतो न आपण। चालायचेच आज बस आता.

Monday, September 20, 2010

२१/९/2010

बरेच दिवसाने लिहिते आहे , लिहिण्य सारखे खूप कही आहे पण वेळ नहीं होत लिहायचे तर॰ संध्याकाळी रोज कही तरी नविन घडते न लोकल नहीं मिळत कही तरी कारण आसते, अचानक काही काम निघते न बस साठी नहीं जाता येत, बस मिळाली तर गर्दी मध्ये आडकते, नसता बस थांबत नाही काही तरी घडते न लोकल च प्रश्न निर्माण होतो आहे, काल सगळे निट होते तर लोकल ला तूफान गर्दी की चढताना मारामारी न उतरताना पण यालाच आयुष म्हणायचे का? आपण कही तरी ठरवतो न घडते दुसरेच काही॰ पण आता या सगळ्याचा कंटाळा आला आहे किती पळापाळी करायची न यातून कही साधले जाते का? अत्ता पर्यंत मुलान साठीच धावत राहिले आजही त्याना गरज आहे म्हणून नोकरी करते का? की मलाही घरा बहर रहता येते त्यामुळे, कही असू देत पण धावपळ ही करावी लगते न, त्याचा आता कंटाळा येत आहे॰ जरा निवांत आयुष्य आसवे असे वाटते आहे पाहू काही करता येते का ते?

Tuesday, September 14, 2010

१५/९/10

रोज तारीख लिहिताना पाहते की आर्धी मराठीत न आर्धी इंग्रजी मधे येते ती दुरुस्त करायची ठरवते पण तसेच राहून जाते॰ आयुष्यात पण आसेच आसते की खूप गोष्टी जशा आहेत तशा समजताता मग त्या दुरुस्त न करताच तशाच चालवून घेत्यला जातात त्याची सवय होउन जाते म्हणा न! आयुष्यात त्या चुकीच्या आहेत हे लक्षात येउन देखील आपण त्या नहीं दुरुस्त करत आसे वाटते की करू नंतर न तसेच राहाते खुप लहनपणापसून माला माहित आहे की "अंथरुण" हा शब्द पण आम्हा सगळयानाच तो हनत्रूण आसा म्हणायची सवय ती लागली ती लागलीच मी लग्न झाल्या नंतर प्रयत्नाने ती बदलली पण अनवधानाने कधी तरी ते हनत्रूण होते अपोआप॰ आसे किती तरी प्रसंग सुध्या आस्तील की ते तेव्हा चुकीचे घडले पण ते ते तसे बरोबर म्हणून मनावर ठसाले न मग ते प्रसंगाना तसेच सामोरे गेले जाते कोणी तरी दाखवून दिले तरच ते चुकीचे म्हणून लक्षात येते नसता ते इतराना देखिल खटकण्या सारखे नसते॰ आज काल लिहिणे देखिल आसेच होते आपोआप कही चुकत आसेल तर कोणी दाखवून दिले तरच लक्षात येईल पण हे वाचणार कोण न माला सांगणार कोण?

Thursday, August 26, 2010

२७/८/10

काल लिहिले न एडिट करण्या आधीच पाठवले गेले जाऊ देत तसे कही विशेष लिहिले नव्हते पण... आज परागला फोन केला पण त्याना कोणाला कशाचा सिरियस पणा जाणवत नाही॰ का वागते माई आशी का नहीं ती गोष्टी समजून घेत कोणी मुद्दाम तिला बाजूला टाकते का? आम्ही जेव्हा कधी जमेल तशी एकमेकांशी धरून राहतो न! का नहीं तिला असे कोणाला तरी धरून रहायला जमत॰ मी आता वालचंद नगर ला जायचे म्हणते पण बाकी किती ओढ़ाताण होईल याचा विचार ती करते का? ती रिकामी आहे म्हणून दुसर्याच्या आड़चणी तिने समजून घेऊ नयेत का? मी मझा वैताग आज इथे लिहित आहे॰ पण तो कुणाला सांगणार न? मग असे स्वताःचे मन मोकळे करायचे जगात तर पुन्हा सारे विसरून नॉर्मल आयुष जगायचे असते न? तिला ह्या गोष्टी समजत नाही का? आता तिची देखिल पन्नाशी उलटली ती का अशी वागते? का आपले लाड़ पुरवले जातात म्हणून माझ्या सारखे माझा कोणी विचार करणारेच नसते तर ती नॉर्मल वागली आसती का? कोणी माझे लाड्कोड पुर्विणारे भेटले आसते तर मी ही अशी झाले आसते का? का की हा ज्याचा त्याचा स्वभावच आसतो, काही समजत नाही॰ डोके भणभणायला मात्र लगते॰ जाऊ देत सरे इथेच सोडावे न आपल्या उद्योगाला लगावे.

Wednesday, August 25, 2010

२६/८/10

आज लिहिताना नक्की काy लिहावे विचार एक विषयावर नहीं थाम्बत आहेत.सकाळी सकाळी खुप सुन्द्दर मेल वाचला खुप चांगले वाटले कूप कही लिहिले होते पण त्यातले एक खुप अवदले, बदल बदलल्याने आयुष बदलत नहीं तर बदल स्विकर्ल्याने आयुष बदलते आगदी खरे आहे जी परिस्थिति आहे टी स्वीकारुन आयुशत वाटचाल केलि तर टी जास्त सोपे जाते.तसे बदल सतत आपल्या न काळात पण हॉट आसतात आपण तय जुन्य विचारानाच चिकटून राहिलो तर आयुष्य तिथेच थम्बेल न कोणतीही थम्ब्लेली गोष्ट संपली टी ख़राब ज़लीच म्हणून समजा। त्यासाठी बदल स्वीकारुन ते आच्र्नत आनले पाहिजेत हे निश्चित.

Saturday, August 21, 2010

२२/८/10

आज घरी कंप्यूटर वर लिहिते आहे॰ रोज ऑफिस मधे मिळतिल त्या १०-१५ मिनिटात लिहायची पण आज ही कही फार लिहू शकेन असे नाही.कारण कामे वाट पाहत आहेत, आजुन कचरा काढून पण झालेला नाही, तरीही बसले नेट वर । काल तर खुप कही लिहायचे ठरवत होते। मी "विजयनगर" पुस्तक वाचते आहे माहित नसलेला इतिहास पण किती तरी नवे लहानपणी इतिहासात वाचली ती नावे सापडली की अरे हे तर आपल्याला माहित होते पुस्तक चांगलेच आहे.पण ते लिहिण्याचा कही विचार नव्हता पण असेच होते जे लिहायचे ते भलती कडेच जाते न दुसरेच कही तरी लिहून जातो आपण पण आज लक्षात राहिल कारण मला माझा ब्लॉग शोधता आला न त्यावर कही तरी लिहिता आले॰ खुप धोबल पणानी मी सरे पहात जाते जमेल तसे लिहित जाते, आर्थात कोणी वाचावे ही माझी आपेक्षाच नाही आहे मी लिहिते आहे ते मज्यासठी "only mine & for myself" बस आज इतकेच.