Friday, December 31, 2010

१/१/11

आज नविन वर्ष, स्वताःच स्वताःला शुभेच्छा घ्याव्यात, कारण आपणच आपणासाठी काही तरी प्रोब्लेम निर्माण करत आसतो॰ नविन वर्षात काय काय सामोरे येणार काय माहित? पण म्हणुनच वाटचाल करायला बारे वाटते, उद्या काय होणार हे जर आज कळले तर जगण्यातला उत्सहच निघून जाईल रोज काही तरी नविन वाट्याला येते म्हणून आपण आयुष्य नाव्यनी जगतो न? कही तरी वेगले आयुष्यात घडत राहते, न ते खरेच गरजेचे आहे॰
मी के करावे हे मझ्या हातात आसते तर प्रतेक जण स्वतःला हवे तेच घडवून घेउन जगला आसता, नको ते केव्हाच सोडून नुसते त्याला हवे तसे आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला आसता॰ आज तसे नहीं म्हणून माणूस माणूस म्हणून कुठे तरी सापडतो आहे॰ नसता मणसातला राक्षस पदोपदी दिसला आसता॰, अत्ता सारे कंट्रोल त्या परमेश्वराच्या हातात आहेत म्हणून माणूस जागेवर दिसतो आहे॰ जाऊ देत नविन वर्षात त्या नियन्त्याची आठवण ठेवणे न येइल त्याला सामोरे जाणे या शिवाय माझ्या पुढे कही पर्याय नाही॰ बस आता वाट पहायची ती शेवटची, त्याची मात्र आता ओढ़ लागली आहे, या वर्षात तरी पर्मेश्वराकडे हेच मागणे आसेल की या सगळ्यातून आता सोडव.

Monday, December 20, 2010

२१/१२/2010

आज लगेच सापडला ब्लॉग, रोज उघडायला हवा तो न कही तरी लिहित गेले पाहिजे॰ काय लिहायचे हे आज काही ठरवले नहीं, तसे आपण ठरवलेले काही घडते का? ठरवावे न तिथे कही तरी आडचण यावी हे तर नक्की ठरलेले॰ तसे आता सगळे रूटीन बसले आहे, रोज घरी जाते, जेवते, पुस्तक वाचते, झोपते पुन्हा उठते, लोकल पकड़ते, ऑफिस ला येते, त्यात कही बदल नहीं होत आहे, याचाही कन्टाळा येतो, खरे तर आता नोकरी करण्याचाच कन्टाळा आला आहे पण काय करू घरी बसून, वेळ जायला तरी हवा न? नसता आणखिंनच मोकळा वेळ मग जास्तच निराश होत जाईन पाहते आहे, कही सापडले की नोकरी पण सोडून देइन आता कुणासाठी कही करायचे म्हणून नाही आड़कनर॰ पाहू यात परमेश्वराच्या मानत काय आहे ते, त्याच्या वर सारे सोपवावे न गप्प रहावे असे आज तरी वाटते आहे.