Sunday, April 11, 2010

१२/४/10

फोटो उपलोड करायचा प्रयत्न करत होते पण नहीं जमात आहे, आता मेधालाच विचारेन महिला दिन निमित्त्य मी काय बोलले ते विचारत होती ऑफिस मधे महिला दिन निमित्त्य कार्यक्रम होता, सगळ्या बयकानाच बोलावले होते विषय होता, मी न माझे कार्यालय, मी न माझे कुटुम्बा, मी न माझे आरोग्य। बोलणारी प्रतेकजण महिला दिन निमित्य शुभेच्छा देत होत्या , का आपणच आपल्याला शुभेच्छा घ्यायच्या? माझा पहिला दावा हा होता, जे कही आम्ही बोलणार ते ऐकायला कोणी पुरुष नकोत? माझे कार्यालय बाबत मी बोलले पण मी तर पूर्णपणे field duty केली, मला कार्यालय आसे नव्हतेच ते सांगितले, की बाहेर बरोबरीने काम करणारे पुरुषच विश्वास ठेउन साथ देतात न? बाकी समजापसून कही त्रास होऊ नये म्हणून ते सोबत करतात न? तसेच रोजच्या जीवनात सुध्या आपल्याला सुटका हावी आसते ती पुरुषांपसून नहीं तर पुरुषीपणाच्या दृष्टिकोना पासून.तो बदलला की खुप गोष्टी बदलतात, शेवटी एकमेकाना सोबत तर हावी आसतेच मग समजून घेउन जर ती सोबत केली तर आयुष्य जास्त सुखाचे होते। आपल्याकडे, आर्ध नट नारेश्वरी ही एक कल्पना आहे ती प्रतेकासठी लागू होणारी आहे, कारण त्याशिवाय एकमेकाना पूर्णत्व नाहीच आहे। आपल्याला बायकांचा सुध्या दृष्टिकोण बदलला पाहिजे, रोजच्या चाकोरीतून न जाता एखादी जरा हटके जात आसेल तर एकदम तिला वाइट नहीं ठरवले पाहिजे.या देवी सर्व भूतेशु आशी एक प्रार्थना आपल्याकडे आहे, त्यात सर्व देविना आवाहन केलेले आहे, धन देवता, भूदेवी, विद्या देवी शक्ति , भक्ति .त्यात एक देवी ठेवायची,manegment ची देवी, जे कम स्त्री वर्षानु वर्ष करत आलेली आहे, त्यामुळे समाज स्थीर आहे, मुले बाळे व्यवस्थीत राहतात, घराचे घरपण टिकून राहते, स्त्री घराबाहेर पडली पण तिने तिची मनेजमेंट नहीं सोडली, ती घराबरोबर ऑफिस च ही कारभार पाहू लागली। स्त्री विचरने बदलली पाहिजे तरच सरे बदलू शकते। खरे तर महिला दिन हा वेगळा साजरा करण्याची गरजच नहीं भासली पाहिजे। ती समजबरोबर समरसून गेली की त्याना वेगळेपण देण्याची काय गरज? ती म्हणजे सुख मिलण्याचे साधन ही संकल्पनाच बदलली पाहिजे। आसे कही बही बोलले सोमोरच्या बयकाना ते पटले आसवे कदाचित म्हणून फोटो न सरे सोपस्कार झाले आसवेत.

Thursday, April 8, 2010

९/४/10

आरोग्य पत्रिकेत महिला दिन निमित्त्य भाषण करतानाचा फोटो आला सगळीकडे कौतुक झाले, अंक घरी नेला पण घरात नहीं दखावणे झाले कोणी तो अंक ऊघडून नहीं बघणार माला माहित आहे तेवढ़ा इंटेरेस्ट कोणालाच नसणार आहे॰ भाषण छान झाले होते हे माला माहित आहे पण त्या गोष्टींचा रोजच्या जीवनात कही फायदा आसतो का? किती तरी गोष्टी, ऊस्फुर्त पणे घडतात, पण आसा चान्स किती वेळा मिळतो, सरकारी नोकरी इथे कशाला कही वाव नहीं, न मग डोके पण कम करेनसे होते। अता या नोकरीचा पण कंटाळा यायला लागला आहे॰ पण आणखी ५ वर्षे करणे भाग आहे॰ पाहू यात कसे कसे जमते ते॰ वेळ सम्भाळायची, बस जबाबदारी आहे म्हणून काम करायचे॰ मानसिक समाधान या नोकरीत कधीच नहीं वाट्याला आले॰ माला माहित आहे की या नोकरी मुळे मी न मुले निटपणे रहू शकलो, मुले शिकू शकली तरीही हे समाधान नहीं ते नाहीच बस पाट्या टाकणे चालू आसते माझे, आले ते काम करायचे दिवसाचे ८ तस पूर्ण झाले की आजचा दिवस संपला म्हणायचे न बाजूला सरकायचे॰ आता आयुषात पण आसेच आहे, जबाबदारी संपली, आपली कोणाला गरज नहीं राहिली, माझी मुले मझ्याशी नाहीत तशी वागत पण माझ्या मनातून या गोष्टी जात नाहीत, कदाचित जोड़ीदार आसता तर हे इतके नसते जाणवले, पण आसे वाटते की आयुष्यातली ५२ वर्षा संपली पुढची संपतील का? असे विचार सुरु झाले की मन अस्वस्थ होते, कही तरी चुकाते आहे असे वाटत रहते, जोड़ीदार नसणे हा माझा आपराध नहीं पण त्यामुळे येणारे वैफल्य नहीं न संपत॰ तरी या विचारांकडे नहीं मी मनाला जाऊ देत, तरीही कधीतरी तो विषय डोक्यात येतोच, आजही तसेच आहे मनाला सावरले पाहिजे यावर दूसरा कही इलाज नहीं ,बस आज इतकेच.

Tuesday, April 6, 2010

७/४/10

आज सकाळी चालत येताना दोन लहान मुले एकमेकाच्या गळ्यात गळा घालून रस्त्याने जात होते मस्त त्यांच्या त्यांच्या विश्वात रममाण झालेले कशाकडे लक्ष नव्हते मला माझे लहानपण आठवले, किती मस्त काळ आसतो न तो, मैत्रिणीशी भंआड़ायाचे तरी सकाळ झाली की तिची आठवण येणारच, मग कही तरी कारण काढून तिच्याकडे जयाचे, ती ही आपल्या सारखीच आस्वस्थ झालेली आसयची एक्मेकीना पाहिले की कालचे भांडण विसरले जायचे न एक्मेकीची ओढ़ जास्त जाणवायची ते दिवस वेग्ळेच होते, आभ्यासाचे बर्डन नव्हते, बस पास होताहेत न मुले आसे म्हटले जायचे। खेळायसाठी घराला आंगन आसायचे न आई वडीलाना कही बोलायचे आसले की आमची रवानगी अज्जाद त्या आंगणात खेळायला व्हायची मी तर सगळे खेळ खेळायची आगदी गोट्या, आंब्याच्या कोई, चोर पोलिस, डबा येसपैस, कसा वेळ संपायचा हे समजायचे नहीं माझ्या आयुषात मी आभ्यासा साठी कधी नहीं मर खाल्ला पण खेळून घरी ऊशीरा आले म्हणून खुपदा शिक्षा भोगली आहे.आज त्या दोन मुलाना पाहिले न ते दिवस आठवले, कही काळ का होईना सरे टेंशन विसरून त्या क्षणात जाऊन पोहचले.त्यानंतर खुप जबाबदार्या कदाचित आयुषात येणार आसतील म्हणून तो तसा बिनधास्त काळ वाट्याला आला असावा.

७/४/१०

Sunday, April 4, 2010

५/४/10

कही वेळा खूप लिहायचे आसते पण लिहायला जमत नहीं, वेळ नसतो, कधी कम्पूटर काम करत नहीं आजच लिहित होते न एकदम एरर आली पाना वर धोंडोपंत कसे के लिहितात ,तसेच सरदेसाई पण माला कधी वेळ नहीं जमत, मूड आसतो तेव्हा नहीं लिहिले की नंतर नाहीच सुचत कही, पण anyhow मी लिहायचा प्रयत्न तरी करते आहे।
लग्नाची गोष्ट झाली काल आसे भातुकलीच्या खेळाताले लग्न झाले न तेव्हा पासून जी जबाबदारी आली ती आजपर्यंत निभावते आहे॰ love marriage त्यामुळे माहेरी कोणी बोलावणार नव्हते, दीपवली आली न ससुर्वाड़ी कडून बोलवाने येणार का? म्हणून चिडूवून ही घेतले॰ पण ते शाक्य नव्हते दीवाली च दिवस ऊजडला, सकाळी सकाळी पाणी गरम करायला ठेवले होते, न हॉस्पिटल मधून खरेच बोलावणे आले दोघेही गेलो, हॉस्पिटल मधून बोलावणे म्हणजे, कही तरी गंभीर नक्कीच होते, गेलो तर दोघी मायलेकी lepra reaction साठी अडमिट होत्या आई जरा serious होती, न नेमका दिवालीचा दिवस तिचा शेवटचा ठरला होता॰ lepra reaction नेच मुलगी पण दाखल झालेली आम्ही तापसले, नाड़ी लगत नव्हतीच पण आम्ही technician न आम्हाला रुग्ण मेला असे नहीं म्हणता येत, बाकी सगले सोपस्कार चालू झाले, ती मुलगी, तिच्या लक्षात आले की आपली आई नहीं राहिली या जगत, ती जी धावत आली ती थेट गळ्यात पडली कही बोलायला सांगायला वाव नव्हताच तिची कशी बाशी समजूत घातली पण आक्खी दीवाली ऊदास ऊदास गेली, कायम लक्षात राहिलेली ती दीवाली, दिवाळसणासाठी बोलावण्याची वाट पाहत होतो, पण त्या दीवाली ने माणसाची पराधीनता प्रकर्षाने जाणून दिली॰ चालायचेच,यालाच जीवन आसे महानत आसवेत.

५/४/10

माझ्या लग्नाची गोष्ट

तसे लग्न म्हटले की नविन साडी, सजलेल्या बायका, शेहनाई, धावपळ, जेवणाचा एक खास वास. माझ्या लग्नात आसे काहीच नव्हते। धावपळ होती पण ती नवरा नवरीची॰ कारण होस्ट पण आम्हीच, न ऊत्सः मूर्ति पण आम्हीच। लग्नाला जेवणासाठी एकुण २५ माणसे आसतील आशी यादी ठरलेली। दोघांचा मिळून महिन्याचा जमलेला पगार ९००रु न मागची शिल्लक ४०० रु। एकुण १२०० रु॰ लग्न करायचे ठरलेले॰ त्यात ३५० रु मंगलसूत्र १००रु साडी, ५० रु च शर्ट, न मग महिना भारसठी म्हणून भरलेले सामान दबामी करायचा म्हणून रव्याचे लाडू केलेले, भात सम्भार केलेला, न मी पोळ्या लटत बसलेली बाहेर धुल्लाप्पा म्हणून यांचा मित्र त्याची गड़बड़ चाललेली, गोरज मुहुर्तावर लग्न लावायचे ठरलेले। आमचे घर होते बन्दोरवाला लेप्रोसी हॉस्पिटल मधेच दोन खोल्या, नेमके परदेशी पाहुणे आलेले त्या दिवशी त्याना लग्नासाठी दोन तासांची सुट्टी मिळालेली मग मुहुर्त गाठ्ण्यासाठी धडपड.नवर्या मुलीला बोलवा म्हणून आवाज आलेला न माझी तव्यावर शेवटची पोळी चाललेली, ससुबैअना पोळ्या करता येत नव्हत्या। आजुन तोंड धूऊन साड़ी बदलायची होती आवरायचे होते, मेंदी etc.काहीच नव्हते कशी बाशी साड़ी नेसली, सगळे आवरले न आमचे लग्न लागले.त्यानंतर जेवणाची घाई पण जेवान वाढणार कोण? पुन्हा पार्ट बदलला नवरा नवरी वढ़पी झाले .दोन पंक्ति झाल्या न परदेशी पव्हणे ऑफिस ला भेट द्यायला आल्याने नवर्याने वरमाला काढून ठेवलीच होती त्या नविन शर्ट वर एप्रन चढवला न कामाला धवला नवरी बाकीचे पहु लागली, आलेले पव्हणे त्याना या म्हांणणे, जेवायला पांगत मांडणे, जेवायला वाढ़णे चालू होते.माझ्या माहेरची माणसे म्हणजे म्हणजे मामा, मामी, मावशी लग्नाला आले होते पण ते लेप्रोसी हॉस्पिटल न जेवायला फ़क्त माजे दोन मामच बसले त्यानी मामाची आश्तापुत्रा साड़ी आणली होती छान होती साड़ी पण त्यानाही परत जयाचे होते मी तर नवर्याच्या घरी काल पासूनच आले होते न, नो पाठवणी, नो रड़ने माहेरची मानसे आली दोन घास खाऊन निघून गेली। आता त्या होस्पिटलच्या सहेबाचे लग्न न तेहि तिथेच कम करणार्य मैडम बरोबर मग शुभेच्छा देण्यासाठी रांग लागली आनपेक्षित पणे कैतुकाने ते कुष्ठरोगी भेटायला येत होते.न त्यांचे लड़के साहेब त्याना जेवणार का विचारताच ते बिचारे जेवायला बसत होते। १५० रुग्नाचा वार्ड तो, न प्रतेकला साहेब म्हणजे जिव की प्राण.स्वायपक केलेला २५ माणसांचा येणार्याला जेव म्हाणणरा मझा नवरा मोठ्या मनाचा पण आम्हा सासु सुनांची कोण धावपळ सगळ्याना भात आमटी तरी पानात वाढायला पाहिजे न? लग्नाचे लाडू पहिल्या दोन पंक्तित्च संपलेले। धकते दिर, त्यांचा माला न समजणाजरे तमिळ मधे बडबड आसलेले, शेवटी कंटाळून जेवायला बसलेले माझा नवरा येणार्य प्रतेकला जेवायला घालत आसलेला न मी मिहिन्य भरसठी भरलेले रेशन एक दिवसात संपवून मोकळी झालेले कसे बसे रात्रि ९ वाजता सरे ऊरकले.आम्ही कोणालाही आमंत्रण दिलेले नव्हते पण लग्नासाठी स्वयं स्फुर्तिने आलेल्या त्या जिवाना लग्नाचे जेवण देणारा माझा नवरा मोठ्या मनचा पण लगनतली गम्मत वाट्याला आलीच नहीं, घास भरवणे नहीं, ऊखाणा नहीं, बस रांधा, वाढा न ऊष्टि काढ़ा एकदाचे सारे संपले, जरासा श्वास टाकला न पोटातल्या भुकेनी जाणीव दिली सगल्याना जेवायला घालून जे शिल्लक राहिले होते ते घेउन सासुबाई शेजारच्या दादान आई म्हणायचो आम्ही त्यांचाकडे जेवायला गेल्या आम्ही दोघे तसेच घरात शिल्लक कही नव्हते, काही नविन करण्याची तकाद नव्हति कोणाला कही म्हाणता येत नवते, मझा नवरा चुकला होता न, २५ मनसे म्हाणता म्हाणता त्याने २०० मनसे जेवायला घातली होती न मी त्याला साथ दिली होती न? जरा शोधा शोध केल्यावर एक डब्यात कालची भाकरी न भात भरून ठेवलेला daba सापडला, tondi लावायला लोणचे होते बस तो दबा तसाच दोघंमधे ठेवला न आमची लग्नाची पंगत जेवायला बसली माहेरचे कोणी नव्तेच न सासरचे सगले रुसलेले एकमेकाना तोच घास भार्व्ला , आता अशीच साथ दोघाना द्यायची होती पण टी शिली पोली न भात सुधया तय दिवशी खुप गोद वाटला बहुला बहुलिच्या लगनत सुधया बहुला बहुली ला जरा मन आसतो पण इथे सारेच ऊर्फाते होते स्वथाचे स्वता ठरवले होते न सरे दुसर्या दिवशी ऑफिस स्टाफ ला जेवण न रजिस्टर लग्न होते त्याची तयारी आशी नवति सगले होटल मधे ठरवले होते पण आता मामने घेतलेली सदी दूसरा दिवस साजरी करायला होती, तेवा आत्ता सारखे फल पिको पाहिजेच न मचिंग ही पाहिजे आसे नवते टी सदी पन्ध्र्य पोल्क्यावर नेस्ले, न सह्या केल्या। आता मात्र सगले जेवायला होटल मधे गेलो पण असे तट सज्वाने वगारे कही नहीं नोर्मल जेवलो नहीं म्हणायला ऊखाना जाला न एक लग्नाची गोष्ट संपली, ३० वर्षा जाली या घटनेला, पण आजुनही तो स्टोव तो कुकर न दिराची बडबड लोकांची भेटायची घी तशीच आठवते। लग्न तसे ८ वर्षच राहिले, सची (कृष्ण) छे वडिल वरले एक्सिडेंट मधे पण आठवणी तश्याच राहिला, कोणाला सांगितले तर विश्वास नहीं बसणार आशा.