Thursday, April 8, 2010

९/४/10

आरोग्य पत्रिकेत महिला दिन निमित्त्य भाषण करतानाचा फोटो आला सगळीकडे कौतुक झाले, अंक घरी नेला पण घरात नहीं दखावणे झाले कोणी तो अंक ऊघडून नहीं बघणार माला माहित आहे तेवढ़ा इंटेरेस्ट कोणालाच नसणार आहे॰ भाषण छान झाले होते हे माला माहित आहे पण त्या गोष्टींचा रोजच्या जीवनात कही फायदा आसतो का? किती तरी गोष्टी, ऊस्फुर्त पणे घडतात, पण आसा चान्स किती वेळा मिळतो, सरकारी नोकरी इथे कशाला कही वाव नहीं, न मग डोके पण कम करेनसे होते। अता या नोकरीचा पण कंटाळा यायला लागला आहे॰ पण आणखी ५ वर्षे करणे भाग आहे॰ पाहू यात कसे कसे जमते ते॰ वेळ सम्भाळायची, बस जबाबदारी आहे म्हणून काम करायचे॰ मानसिक समाधान या नोकरीत कधीच नहीं वाट्याला आले॰ माला माहित आहे की या नोकरी मुळे मी न मुले निटपणे रहू शकलो, मुले शिकू शकली तरीही हे समाधान नहीं ते नाहीच बस पाट्या टाकणे चालू आसते माझे, आले ते काम करायचे दिवसाचे ८ तस पूर्ण झाले की आजचा दिवस संपला म्हणायचे न बाजूला सरकायचे॰ आता आयुषात पण आसेच आहे, जबाबदारी संपली, आपली कोणाला गरज नहीं राहिली, माझी मुले मझ्याशी नाहीत तशी वागत पण माझ्या मनातून या गोष्टी जात नाहीत, कदाचित जोड़ीदार आसता तर हे इतके नसते जाणवले, पण आसे वाटते की आयुष्यातली ५२ वर्षा संपली पुढची संपतील का? असे विचार सुरु झाले की मन अस्वस्थ होते, कही तरी चुकाते आहे असे वाटत रहते, जोड़ीदार नसणे हा माझा आपराध नहीं पण त्यामुळे येणारे वैफल्य नहीं न संपत॰ तरी या विचारांकडे नहीं मी मनाला जाऊ देत, तरीही कधीतरी तो विषय डोक्यात येतोच, आजही तसेच आहे मनाला सावरले पाहिजे यावर दूसरा कही इलाज नहीं ,बस आज इतकेच.

No comments:

Post a Comment