Thursday, August 26, 2010

२७/८/10

काल लिहिले न एडिट करण्या आधीच पाठवले गेले जाऊ देत तसे कही विशेष लिहिले नव्हते पण... आज परागला फोन केला पण त्याना कोणाला कशाचा सिरियस पणा जाणवत नाही॰ का वागते माई आशी का नहीं ती गोष्टी समजून घेत कोणी मुद्दाम तिला बाजूला टाकते का? आम्ही जेव्हा कधी जमेल तशी एकमेकांशी धरून राहतो न! का नहीं तिला असे कोणाला तरी धरून रहायला जमत॰ मी आता वालचंद नगर ला जायचे म्हणते पण बाकी किती ओढ़ाताण होईल याचा विचार ती करते का? ती रिकामी आहे म्हणून दुसर्याच्या आड़चणी तिने समजून घेऊ नयेत का? मी मझा वैताग आज इथे लिहित आहे॰ पण तो कुणाला सांगणार न? मग असे स्वताःचे मन मोकळे करायचे जगात तर पुन्हा सारे विसरून नॉर्मल आयुष जगायचे असते न? तिला ह्या गोष्टी समजत नाही का? आता तिची देखिल पन्नाशी उलटली ती का अशी वागते? का आपले लाड़ पुरवले जातात म्हणून माझ्या सारखे माझा कोणी विचार करणारेच नसते तर ती नॉर्मल वागली आसती का? कोणी माझे लाड्कोड पुर्विणारे भेटले आसते तर मी ही अशी झाले आसते का? का की हा ज्याचा त्याचा स्वभावच आसतो, काही समजत नाही॰ डोके भणभणायला मात्र लगते॰ जाऊ देत सरे इथेच सोडावे न आपल्या उद्योगाला लगावे.

Wednesday, August 25, 2010

२६/८/10

आज लिहिताना नक्की काy लिहावे विचार एक विषयावर नहीं थाम्बत आहेत.सकाळी सकाळी खुप सुन्द्दर मेल वाचला खुप चांगले वाटले कूप कही लिहिले होते पण त्यातले एक खुप अवदले, बदल बदलल्याने आयुष बदलत नहीं तर बदल स्विकर्ल्याने आयुष बदलते आगदी खरे आहे जी परिस्थिति आहे टी स्वीकारुन आयुशत वाटचाल केलि तर टी जास्त सोपे जाते.तसे बदल सतत आपल्या न काळात पण हॉट आसतात आपण तय जुन्य विचारानाच चिकटून राहिलो तर आयुष्य तिथेच थम्बेल न कोणतीही थम्ब्लेली गोष्ट संपली टी ख़राब ज़लीच म्हणून समजा। त्यासाठी बदल स्वीकारुन ते आच्र्नत आनले पाहिजेत हे निश्चित.

Saturday, August 21, 2010

२२/८/10

आज घरी कंप्यूटर वर लिहिते आहे॰ रोज ऑफिस मधे मिळतिल त्या १०-१५ मिनिटात लिहायची पण आज ही कही फार लिहू शकेन असे नाही.कारण कामे वाट पाहत आहेत, आजुन कचरा काढून पण झालेला नाही, तरीही बसले नेट वर । काल तर खुप कही लिहायचे ठरवत होते। मी "विजयनगर" पुस्तक वाचते आहे माहित नसलेला इतिहास पण किती तरी नवे लहानपणी इतिहासात वाचली ती नावे सापडली की अरे हे तर आपल्याला माहित होते पुस्तक चांगलेच आहे.पण ते लिहिण्याचा कही विचार नव्हता पण असेच होते जे लिहायचे ते भलती कडेच जाते न दुसरेच कही तरी लिहून जातो आपण पण आज लक्षात राहिल कारण मला माझा ब्लॉग शोधता आला न त्यावर कही तरी लिहिता आले॰ खुप धोबल पणानी मी सरे पहात जाते जमेल तसे लिहित जाते, आर्थात कोणी वाचावे ही माझी आपेक्षाच नाही आहे मी लिहिते आहे ते मज्यासठी "only mine & for myself" बस आज इतकेच.

Friday, August 20, 2010

२०/८/10

आज सकाळी सकाळी कम चालू होते रोजच्या सारखे गाणी चालू होती न खूप ओळखीचे म्युजिक लागले पण गाणे आठवेना हातातले काम थांबले इतके ते गाणे ओळखीचे होते गाणे सुरु झाले ते आभिमान मधले "अरे मित ना मिला रे मन का" माझ्या सगळ्यात आवडीचे आभिमान मधली सगळीच गाणी चांगली आहेत पण मला सगळ्यात आवडते ते हे गाणे॰ आनंद न आभिमान हे दोन्ही सिनेमा बघायला जायचे म्हणून भांडून गेलेले, तेव्हा सिनेमा आसा घरापर्यंत पोह्चलेला नव्हता॰ आनंद पाहिला पण आभिमान बघण्यासाठी खूप वाट पाहावी लागली॰ सिनेमातील हीरो न हिरोइन बघून नव्हता सिनेमा पहात तर गाणी ऐकून ते पहायचे ठरविले होते॰ आनंद मधील "जिन्दगी कैसी है पहेली" हे गाणे ऐकून तो सिनेमा बघायचे ठरविले होते॰ आज ते गाणे ऐकले न ते दिवस पुन्हा आठवले, सारे काम सोडून ते गाणे पुन्हा बघितले असे वेड आसलेले दिवस कधी मागे पडले ते समजलेच नाही॰ रोजच्या धकाधाकित आपल्या आवडी पण विसरून जातो न आपण॰.जाऊ देत पुन्हा जुन्य गोष्टी आठवल्या की बरे वाटले दूसरी गोष्ट म्हणजे आज बस मधून उतरले न पोत्राज समाजाच्या २ बायका ढोलके घेउन न सोबत २ लहान मुले पोत्राजच्या वेशात लहान लहान चाबुक त्यांच्या हातात होते उद्या ते सुद्या अंगावर चाबुक मारून घेणार, हेच शिक्षण त्याना दिले जाणार न त्याच रत्यावर २ मुले घेउन २ बायका शाळेत सोडण्यासाठी निघाल्या होत्या किती तफावत होती दोन्ही शिक्षणत दोन्ही आई मुलाना शिक्षण देण्यासाठी तयार करत होत्या पण ...हा पण सापडेल का? माझ्या मानत हा विचार येतो त्या मुलीला वाटत नसेल का की आपल्या मुलाने शाळेत जावे कही तरी शिकवे न मोठे व्हावे मला माहित आहे याचे उत्तर माज्याकडे nahi, कोणाकडेच नहीं.

Tuesday, August 17, 2010

१८/८/10

काल मई च फोन आला न तशी मी disturb झाले, काय केले म्हणजे तिचे विचार बदलतील॰ का तिचा स्वाभाव असा बनला असेल॰ आयुष्यात चढ़ उतार तर प्रतेकाच्या वाट्याला येतात पण दर वेळी आकंड तांडव करून काय पदरात पड़ते॰ कोणी कोणाचे नशीब तर नहीं बदलू शकत ती हा विचार का नहीं करत॰ मी म्हटले म्हणून कही तिच्या मुलाला चांगली नोकरी मिळेल का? मी म्हणाले म्हणून चांगली बायको मिळू शकते का? जे ज्याच्या वाट्याला येणार ते त्याच्या वाट्याला येणार न ते भोगूनच आयुष्य पर करावे लगते हे कसे समजावयचे तिला जाणार आहे वलचंनगर ला पाहू यात कही बदल होतात का?
खुप विचार करते , असे ती का वागत असेल, का नहीं ती दुसर्या बाजूने विचार करायला शिकत॰ आयुष्यात त्यामुळे किती मोठा फरक पडतो, आपल्या बरोबर दुसर्यांचे पण आयुष्य सुखावह होते न, जाऊ देत जास्त विचार नहीं करायचा या गोष्टीचा जे कही घडेल ते तिच्या नशिबाने घडेल॰ आपण फ़क्त प्रयत्न करायचा.

Monday, August 9, 2010

१०/८/10

आजकल मी खडकीला उतरून बस ने विश्रन्तवाङी ला येते काल खडकी स्टेशन वरून रास्ता क़ॅस करत होते कुठल्या धुंदीत होते माहित नहीं पूर्ण रास्ता पार केला पण शेवटी असे वाटले की येणारा गाड़ीवाला माझ्या मागून गाड़ी घेउन जाईल पण तो थेट अंगावरच आला की, सगळे ओरडले रस्त्या वरचे। कसे न किती गोष्टी आपण गृहीत धरतो न? हे असे गृहीत धर्णेच खुप वेळा चुकीचे ठरते त्यापेक्षा स्पष्टपणे काही गोष्टी बोलल्या किंवा एकमेकाना सांगितल्या तर जास्त चांगले होत असेल असे वाटते॰ रोजच्या आयुषात आपण आपल्या बरोबर काम करणारी मणसे आसोत वा सोबत राहणारी न बोलता तुम्ही आसे कराल असे वाटले होते असे सहजपणानी म्हणून जातो पण खुप वेळा या गोष्टी चुकीच्या निघू शकतात॰ नवरा बायको , आई वडिल , बहिण भाऊ, मित्र असे किती तरी जण असतात की न बोलता त्यांच्या कडून अपेक्षा मात्र करत आसतो, पण हेच जर तोंडाने बोलून सांगितले तर किती तरी समज गैरसमज कमी होतील न॰ आज इतकेच बस.

Sunday, August 8, 2010

९/८/2010

आज मझाच ब्लॉग मी वाचत होते,छान वाटले वाचताना.त्या घटकेला काय काय लिहून जातो न आपण.पुन्हा आठवायचे म्हटले तरी आठवत नहीं.लोड केलेला फोटो पण चांगला वाटतो आहे पहाताना नंतर नंत्तर एडिट करायला पण जमायला लागले, ठीक आहे जे मला म्हणायचे आसते तेच लिहिताना लिहिले गेले मग बारे वाटले
मी आता नितिन कड़े म्हणजे माझ्या धाकट्या मुलाकडे रहण्यासठी आले आहे हे बदल तर होणार आहेतच ते स्विकरुनच पुढे जावे लागेल.पण सामान ने आण करताना दमायला होते आहे, पूर्वी सारखा उत्साह नहीं वाटत का ते नहीं माहित पण वय झाले म्हणून ही असेल पण आजकाल लवकर दमते मी.आजही ऑफिस ला यायचे जिवावर आले होते, तसे इथे कम फार नहीं पण लगेच tention येते ते नहीं आले पाहिजे.tention माणसाला निम्मे बर्बाद करते म्हाणायला हरकत नहीं हे समजते बरका पण कोण काय म्हणेल मी कशी वागले म्हणजे दुसरे कोणी दुखावले जाणार नहीं हाच विचार करत बसते म्हणून कदाचित थकत असेन पण वय हा ही १ फॅक्टेर नक्कीच आहे। आता त्या प्रमाणे जरा वागायला पाहिजे हे नक्की उगाच सगळी जबाबदारी आपली हे डोक्यातून काढून टाकले पाहिजे.पाहू यात जमते का ते.नितिन तसे मझ्यासठी खुप करतो, सचीनपण मला काय हवे नको पाहतो पण तो जरा सड़ेतोड़ असल्यामुळे असेल जरा खाटकातच रहते माला कही तरी जाऊ देत सगळ्याकडे दुर्लक्ष करणे हे जास्त सोयीस्कर॰