Friday, August 20, 2010

२०/८/10

आज सकाळी सकाळी कम चालू होते रोजच्या सारखे गाणी चालू होती न खूप ओळखीचे म्युजिक लागले पण गाणे आठवेना हातातले काम थांबले इतके ते गाणे ओळखीचे होते गाणे सुरु झाले ते आभिमान मधले "अरे मित ना मिला रे मन का" माझ्या सगळ्यात आवडीचे आभिमान मधली सगळीच गाणी चांगली आहेत पण मला सगळ्यात आवडते ते हे गाणे॰ आनंद न आभिमान हे दोन्ही सिनेमा बघायला जायचे म्हणून भांडून गेलेले, तेव्हा सिनेमा आसा घरापर्यंत पोह्चलेला नव्हता॰ आनंद पाहिला पण आभिमान बघण्यासाठी खूप वाट पाहावी लागली॰ सिनेमातील हीरो न हिरोइन बघून नव्हता सिनेमा पहात तर गाणी ऐकून ते पहायचे ठरविले होते॰ आनंद मधील "जिन्दगी कैसी है पहेली" हे गाणे ऐकून तो सिनेमा बघायचे ठरविले होते॰ आज ते गाणे ऐकले न ते दिवस पुन्हा आठवले, सारे काम सोडून ते गाणे पुन्हा बघितले असे वेड आसलेले दिवस कधी मागे पडले ते समजलेच नाही॰ रोजच्या धकाधाकित आपल्या आवडी पण विसरून जातो न आपण॰.जाऊ देत पुन्हा जुन्य गोष्टी आठवल्या की बरे वाटले दूसरी गोष्ट म्हणजे आज बस मधून उतरले न पोत्राज समाजाच्या २ बायका ढोलके घेउन न सोबत २ लहान मुले पोत्राजच्या वेशात लहान लहान चाबुक त्यांच्या हातात होते उद्या ते सुद्या अंगावर चाबुक मारून घेणार, हेच शिक्षण त्याना दिले जाणार न त्याच रत्यावर २ मुले घेउन २ बायका शाळेत सोडण्यासाठी निघाल्या होत्या किती तफावत होती दोन्ही शिक्षणत दोन्ही आई मुलाना शिक्षण देण्यासाठी तयार करत होत्या पण ...हा पण सापडेल का? माझ्या मानत हा विचार येतो त्या मुलीला वाटत नसेल का की आपल्या मुलाने शाळेत जावे कही तरी शिकवे न मोठे व्हावे मला माहित आहे याचे उत्तर माज्याकडे nahi, कोणाकडेच नहीं.

No comments:

Post a Comment