Thursday, August 26, 2010

२७/८/10

काल लिहिले न एडिट करण्या आधीच पाठवले गेले जाऊ देत तसे कही विशेष लिहिले नव्हते पण... आज परागला फोन केला पण त्याना कोणाला कशाचा सिरियस पणा जाणवत नाही॰ का वागते माई आशी का नहीं ती गोष्टी समजून घेत कोणी मुद्दाम तिला बाजूला टाकते का? आम्ही जेव्हा कधी जमेल तशी एकमेकांशी धरून राहतो न! का नहीं तिला असे कोणाला तरी धरून रहायला जमत॰ मी आता वालचंद नगर ला जायचे म्हणते पण बाकी किती ओढ़ाताण होईल याचा विचार ती करते का? ती रिकामी आहे म्हणून दुसर्याच्या आड़चणी तिने समजून घेऊ नयेत का? मी मझा वैताग आज इथे लिहित आहे॰ पण तो कुणाला सांगणार न? मग असे स्वताःचे मन मोकळे करायचे जगात तर पुन्हा सारे विसरून नॉर्मल आयुष जगायचे असते न? तिला ह्या गोष्टी समजत नाही का? आता तिची देखिल पन्नाशी उलटली ती का अशी वागते? का आपले लाड़ पुरवले जातात म्हणून माझ्या सारखे माझा कोणी विचार करणारेच नसते तर ती नॉर्मल वागली आसती का? कोणी माझे लाड्कोड पुर्विणारे भेटले आसते तर मी ही अशी झाले आसते का? का की हा ज्याचा त्याचा स्वभावच आसतो, काही समजत नाही॰ डोके भणभणायला मात्र लगते॰ जाऊ देत सरे इथेच सोडावे न आपल्या उद्योगाला लगावे.

No comments:

Post a Comment