Tuesday, September 28, 2010

२९/९/10

खरे तर आज लिहिन असे नव्हते ठरवले पण वेळ मिळाला न मुख्य म्हणजे लिहावेसे वाटले काल सहज "लागा चुनरी मैं दाग" हे गाणे आठवले न आज सकाळी ते रेडिओ वर लागले इतका आनंद झाला कारण ते गाणे ऐकावे असे वाटत आसताना गाणे ऐकायला मिळणे म्हणजे आपण इच्छा करणे न लगेच ती गोष्ट आपल्याला मिळाली की खूप बरे वाटते॰ खरे तर आयुषाची ५० वर्ष संपली आता पण तरीही लहान मुलान प्रमाणे आनंद हा होतच आसतो कुठे तरी त्या भावना मनामध्ये आसतात॰ असे बरेच वेळा घडते की अखाद्याची आपण आठवण काढत आसतो न ती व्यक्ति भेटते तरी नसता त्या व्यक्तीचा फ़ोन येतो हे का घडते याला उत्तर नहीं पण मनाच्या गाभ्या पासून एखादी गोष्ट आपण कधी मागितली तर ती मिळते पण त्या साठी हेतू चांगला पाहिजे॰ हा आनुभव बरेच जाणांना येत आसेल हे निश्चित॰ मी पण हे खुपदा आनुभवते, न मग असे कुठेतरी ते सांगितले पण जाते॰ चला आज बस आता कमला लगावे कसे.

Sunday, September 26, 2010

२७/९/10

काल सगळंयाना दिवाळीसाठी बोलिवण्यासठी पत्र लिहिली खूप दिवसानी अशी पत्र लिहिण्याचा योग आला नसता जे कही बोलणे ते फ़ोन वरून होते मग ती लिहिण्याची मजा नहीं चाखता येत॰ असे घडले त्यामुळे माणसे जवळ अली की लाम्ब गेली हे नहीं सांगता येणार॰ फ़ोन वर आपण आगदी मनातले कधी बोलतो का? का? कशी? असे प्रश्न विचारले जातात पण मनाच्या गभ्यातुन आलेली साद त्या पत्रातच मिळते असे माला वाटते हा॰ शेवटी हा ज्याच्या त्याच्या भावनांचा प्रश्न आहे॰ मला आवडलेली गोष्ट दुस्र्याला आवडेलच असे नहीं॰ तर पत्रा वरून aathvale की माणसे संवाद sadhtana फ़ोन मुळे जवळ अली की लाम्ब गेली फ़ोन mule लगेच त्या क्षणाला साद घालता येते न त्याला प्रतिसाद पण लगेच मिळतो तरीही पत्र लिहिताना मनानी दिलेला आपुलकीचा mulama त्या पत्रातून जाणवतो। फोन आला न माणूस लिहिण्याचे कष्ट घेईना झाला॰ आज काही लिहिता नहीं येणार असे वाटते आहे शब्द lavkar nahit umtat ahet computer वर किती या गोष्टींच्या आधीन होतो न आपण। चालायचेच आज बस आता.

Monday, September 20, 2010

२१/९/2010

बरेच दिवसाने लिहिते आहे , लिहिण्य सारखे खूप कही आहे पण वेळ नहीं होत लिहायचे तर॰ संध्याकाळी रोज कही तरी नविन घडते न लोकल नहीं मिळत कही तरी कारण आसते, अचानक काही काम निघते न बस साठी नहीं जाता येत, बस मिळाली तर गर्दी मध्ये आडकते, नसता बस थांबत नाही काही तरी घडते न लोकल च प्रश्न निर्माण होतो आहे, काल सगळे निट होते तर लोकल ला तूफान गर्दी की चढताना मारामारी न उतरताना पण यालाच आयुष म्हणायचे का? आपण कही तरी ठरवतो न घडते दुसरेच काही॰ पण आता या सगळ्याचा कंटाळा आला आहे किती पळापाळी करायची न यातून कही साधले जाते का? अत्ता पर्यंत मुलान साठीच धावत राहिले आजही त्याना गरज आहे म्हणून नोकरी करते का? की मलाही घरा बहर रहता येते त्यामुळे, कही असू देत पण धावपळ ही करावी लगते न, त्याचा आता कंटाळा येत आहे॰ जरा निवांत आयुष्य आसवे असे वाटते आहे पाहू काही करता येते का ते?

Tuesday, September 14, 2010

१५/९/10

रोज तारीख लिहिताना पाहते की आर्धी मराठीत न आर्धी इंग्रजी मधे येते ती दुरुस्त करायची ठरवते पण तसेच राहून जाते॰ आयुष्यात पण आसेच आसते की खूप गोष्टी जशा आहेत तशा समजताता मग त्या दुरुस्त न करताच तशाच चालवून घेत्यला जातात त्याची सवय होउन जाते म्हणा न! आयुष्यात त्या चुकीच्या आहेत हे लक्षात येउन देखील आपण त्या नहीं दुरुस्त करत आसे वाटते की करू नंतर न तसेच राहाते खुप लहनपणापसून माला माहित आहे की "अंथरुण" हा शब्द पण आम्हा सगळयानाच तो हनत्रूण आसा म्हणायची सवय ती लागली ती लागलीच मी लग्न झाल्या नंतर प्रयत्नाने ती बदलली पण अनवधानाने कधी तरी ते हनत्रूण होते अपोआप॰ आसे किती तरी प्रसंग सुध्या आस्तील की ते तेव्हा चुकीचे घडले पण ते ते तसे बरोबर म्हणून मनावर ठसाले न मग ते प्रसंगाना तसेच सामोरे गेले जाते कोणी तरी दाखवून दिले तरच ते चुकीचे म्हणून लक्षात येते नसता ते इतराना देखिल खटकण्या सारखे नसते॰ आज काल लिहिणे देखिल आसेच होते आपोआप कही चुकत आसेल तर कोणी दाखवून दिले तरच लक्षात येईल पण हे वाचणार कोण न माला सांगणार कोण?