Tuesday, September 25, 2012

काल  मी कांमतीला जाऊन आले .कारण सुरेश वारला हे. तसा काय संबध आमचा? माझ्या वाहिनीचा भाऊ. वय वर्षे ३८-४० फार तर. त्याची बायको, २ मुले कशी राहतील सगळे, कुणाचे काही राहत नाही हे मला माहित आहे, तरीही कसे होईल त्यांचे हे मात्र जाणवत होते.
तिथली परिस्थिती सिनेमात दाखवतात तशी अगदी, मोठे ५-६ खोल्यांचे घर पण तो राहत होता ते गुरांच्या गोठ्यात, का? याला उत्तर नाही म्हणजे मला माहित नाही. घरात एका बाजूला शेळ्या बांधलेल्या, तिथेच फ्रीज, वाशिंग मशीन बांधून ठेवलेले. न दवाखान्यात जाण्यासाठी केलेली टाळाटाळ, पैसे नाहीत म्हणून. काय समजायचे काळात नवते. घरात पोचवून आल्यावर भात पिठले करायचे तर तांदूळ घरात नाहीत. की परिस्थिती आहे, खरेच इतकी हलकी कि  .... मन अस्वस्थ. त्याला याची उत्तरे माहित नाहीत. का असे घडत होते? आता पुढे काय घडेल? त्या बाईला तिथे नीटपणे राहता येईल कि कसे तरी दिवस काढावे लागतील? काय घडेल? काय निर्णय घेतील सगळेजण. माझ्यावर आशीच वेळ आली तेव्हा मला नोकरी असल्याने बाकी निर्णय काही घ्यायचे नव्हते. ईथे सारी जबाबदारी कोण घेणार?भावाभावांचे पटत नव्हते पण आता तो जबाबदारी घेईल का? मुलांचे शिक्षण पार पडेल कि मधेच बंद होईल. मुलगा खूपच लहान आहे, त्याला नीटपणे सांभाळले जाईल का? कि काही वेगळे घडेल? जेवढा विचार करावा तेव्ह्डे डोके गरगरायला लागते आहे.
एकट्या बाईने दिवस निभावणे खरेच आवघड

Friday, September 14, 2012

कालच्या इतकी आज disturb नाही आहे. जे जे असेल भाळी  ते न टळेल कधीकाळी. आज पासून तो विषय सोडून लिहायचे, काही न काही problem सगळ्यांनाच असतात, त्याला मी कशी अपवाद असेन?


  • आज सकाळी redio  एकात होते न सोलापूर नभोवाणीवर "सुनिता तारापुरे" ;या  मुख्य निवेदिका असाव्यात, कारण प्रत्येक चांगल्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग, शास्त्रीय गाण्याचा कार्यक्रम आसो, कि खेलखीलाडी त्या आपल्या त्यांच्या कणीदार स्पष्ट आवाजात विशिष्ठ लाईत  निवेदन करतात, इतके कि आता त्यांचा आवाज कुठेही बाहेर एकला कि मी त्यांना ओळखू शकेन. 
  •  अशी कितीतरी गोष्टी असतात कि आपण त्याच्या नुसत्या वासाने ऐखांद्याला ओळखू शकतो.रस्तापेठेत  अपोलो talkage कडे गेलो कि आसाच मस्त कॉफीचा वास  येतो, पाउस पडत असेल तर हा वास अक्षरशहा वेड करतो पण coffee प्यायला नाही मिळत कारण तिथे coffee ची गिरणी आहे हॉटेल नाही 
  • तसा रेल मध्ये सोलापूर वरून पुण्याला जाताना तेम्भूर्णी गेले कि एक बटाटे वाडेवाला येतो त्याच्या वड्याचा  वास आधीच्या डब्यात तो आला कि यायला लागतो, भूक नसली तरी वाडे घ्यायला लावतो 
  • तसेच डोंगरावर पावसाळ्यात गेलो कि त्या पावसाचा, झाडांचा, वेलींचा, मातीचा अन आपल्या मनस्थितीचा  एक orignal वास येतो तो आला कि आपली पावसाळी सहल सुरु होते ती दमून परतताना अंगात अगदी भिनून जाते, पुन्हा पुढच्या वर्षी परत येण्याचा संकल्प करूनच.
  • साहेबाच्या केबिन मधून येणाऱ्या बेलचा १ आवाज आसतो, आपल्या मनात ज्या दिवशी भीती असेल त्या दिवशी तो आपल्या साठीच बोलावणे घेऊन येतो, हे हमखास घडते याचे कारण नाही माहित.
  • आज लवकर जायचे ठरवले कि साहेब उशिरा पर्यंत थांबतात, बस मिळत नाही, काही तरी घडते न नाराजी मात्र वाट्याला येते याची जाणीव कुठे तरी आधीच माणसाला होते ती का हे नाही सांगता येत तसेच त्या विशिष्ठ वेळी तीच गोष्ट का जाणवते तेही नाही सांगता येत.
  • समुद्रावर गेलो कि तिथल्या वनस्पतींचा, तिथल्या झाडांचा आगदी माशांचा सुध्या वास येतो, मग तो वास इथे शहरात कुठे तरी आला कि झटकन तो समुद्राकाठी नेऊन सोडतो, त्या एका क्षणात मन कुठेकुठे भटकून येते हे कधी अनुभवले आहेत.
  • डोंगर कपारीत भटकताना पाण्या अभावी घशाला पडलेली कोरड न त्या क्षणी झुळू झुळू वाहणाऱ्या पाण्याचा आवाज , ते पाणी दिसे पर्यंतच किती पाणी पिऊ न किती नाही असे होऊन गेलेला क्षण अन लोकाल पकडण्यासाठी घेतलेली धाव, बाटलीतले संपलेले पाणी, न कोणीतरी तिसर्याने दिलेले पाणी  समाधान कदाचित तेच असेल पण मन भरून पावणे समाधानानी ते नक्कीच वेगळे आस्ते, इथे माणुसकीने मन भरते तर तिथे निसर्गानी भरभरून दिलेल्या गोष्टीने. यात श्रेष्ठ काय हा विचार नाही  पण या दोन्ही भावना निश्चित वेगळ्या आहेत.
  • माझ्या लहानपणी मी राजगडावर बालेकिल्ल्यावर गेले होते तिथून पाहिलेले दृश्य, खाली दरीत डोकावले कि धुक्याच्या पडद्यावर आपलाच चेहरा दिसतो आगदी आरशात पहिल्या प्रमाणे पण त्या भोवती सप्त रंगांची वलय असतात, आपण देवाच्या चेहर्या भोवती काढतो तशी आजही इतक्या दिवसा नंतर ते आठवते.  पुन्हा जाऊन पाहायला पाहिजे कि तो अनुभव पुन्हा येतो का? त्याचे कारण नाही माहित मला, ते हि विचारले पाहिजे कुणाला तरी पण आधी जाऊन पहिले पाहिजे न तेव्हा धुके हि पाहिजे.
  • बाकी आता उद्या लिहावे 

kalay tasmeyen maha


  • काल निर्णय झाला न मी रात्री थोडी निवांत झाले. ठरवले कि सचिनशी काहीच बोलायचे नाही, पण सईला भेटायला मात्र जायचे, तिला घेऊन बाहेर जायचे. समजा तिला बाहेर नेण्याला विरोध झाला तर? तेव्हाचे तेव्हा पाहू आज तरी तो विचार करायचा नाही. जायचे तिला बाहेर नेऊन आणायचे घरात येऊन आपण ठरविलेल्या खोलीत वाटते तितके २ तास, ३ तास बसायचे न नंतर निघून यायचे, त्यांनी कोणी बोलावे हि अपेक्षा नाही करायची. मला समजते आहे कि यात सचिन ला बरेच सोसावे लागणार आहे, मी हि आज सोस्तेच आहे न? शेवटी ज्याचे त्याचे नशीब आस्ते आपण नाही  ते बदलू शकत, तसा प्रयत्नही नाही करायचा मला. आज तरी असे ठरवीत आहे, त्यातून काय  वाट्याला येते ते पाहू सध्या तरी कोणालाच काहीच नाही बोलणार आगदी सचिन ला सुद्धा . बाकी तर कोणाचा काही संबंधाच नाही. खरच मी इतकी वईट वागते का?
  • कुठे तरी या गोष्टी समाजात जाणवत असतील न? किती ठिकाणी यैकात आले कि असे झाले न प्रकरण शेवटा कडे चालले आहे. का या मुली आशा वागत असतील त्यांना त्यांचे संसार नको असतात का? तसे पहिले तर सासर म्हणजे फक्त नवरा, मुल न स्वतः एव्हडेच आस्ते का? बाकी कुणाचा विचार नाही येत का? तुमचे संसार उभे राहण्यासाठी कुणी तरी कुठे तरी बलिदान दिलेले आस्ते ते असेच सोडून द्यायचे का? त्याला काही किमतच नाही का? स्वतः पुढे दुसर्याचा विचार करायचाच नाही का? का घडते असे सारे, माणूस सेल्फिश होते आहे कि त्याची नितीमत्ता कुठे तरी संपत चालली आहे. 
  • हे सारे प्रश्न कोणाला विचारायचे, कुठे मिळतील याची उत्तरे ? माझ्या सर्खीने काय करायचे, सगळे आयुष्य  मुलांसाठी जगले न एकदम त्यांना विसरून जायचे तिथे माझ्यासाठी काहीच स्थान नाही का? काडी  काडी  एकत्र करून जमवलेला संसार मुलांच्या स्वाधीन  करायचा, न आपण साध्या शब्दांसाठी मोताद व्हायचे का? कुठे जाणार आहे हे सारे ?




Wednesday, September 12, 2012

kalay tasmeyn maha

आज   किती दिवसांनी लिहिण्यासाठी बसले आहे . काय लिहायचे ते न ठरवताच लिहिते आहे. खूप disturb आहे, पण office मध्ये येते आहे न कामात स्वतःला गुंतवते आहे म्हणून स्थिर दिसते आहे. का आसे घडत असेल माझ्या बाबतीत ? का साधे, सरळ आयुष्य माझ्या वाट्याला येत नसेल, खूप काही आपेक्ष्या ठेवल्या का? कुठे चुकत गेले माझे, मी समोरच्याचा जास्त विचार करते म्हणून आसे घडते का? मला सुख लागले पाहिजे समोरच्याचा नाही विचार करायचा असे ठरवले तर आपल्याला खरेच सुख लागते का? कि हे हि मनुष्या सापेक्ष आस्ते. मुलाचे सुख बघायचे म्हणून मी माझे घर सोडून बाहेर पडले, इथे मी चुकले का? तिथेच तसेच भांडत न एकमेकांवर कुरघोडी करत जगायचे होते का? खरेच नाही लक्षात येत, सचिनला मी फोनेने सुधा बोलणे बंद करायला सांगितले, त्या गोष्टीचा मला जास्त त्रास होतो की तो जी चैकशी करायचा ती फक्त त्या वेळेपुर्तीच  आहे, तिथे मला खरेच आडचण  आली तर तो काही करेल हे कसे गृहीत धरू मी, जो बायकोला माझी आई इथेच राहणार हे नाही सांगू शकत त्यावर काय बोलू मी. आपले नशिबाचे भोग म्हणायचे, स्वतःला सुख लागण्यासाठी, फक्त त्याच्या घरात राहता यावे जे पूर्णपणे मीच उभे करून दिले, आगदी सगळ्या सामानापासून तरीही तिथे मी परकी की अधिकार दाखवायला जाऊन मुलाचे सुख बिघडवू . काहीच समजत नाही, मी मुकाटययानी त्याच्याशी सगळे काही सोडून दिले आज ठरवते आहे जोपर्यंत तो इथे भारतात आहे तोपर्यंत साई साठी जायचे आपले आपण भेटायचे , तिला बाहेर घेऊन जायचे वाटले तर तिथेच खेळायचे बाकी कोणाशीच काहीही बोलायचे नाही न माघारी फिरायचे. पाहू यात एवडे तरी मिळते कि तिथेही आणखी काही वाट्याला येते ते? कालाय तस्मेयेन  माः .