Tuesday, September 25, 2012

काल  मी कांमतीला जाऊन आले .कारण सुरेश वारला हे. तसा काय संबध आमचा? माझ्या वाहिनीचा भाऊ. वय वर्षे ३८-४० फार तर. त्याची बायको, २ मुले कशी राहतील सगळे, कुणाचे काही राहत नाही हे मला माहित आहे, तरीही कसे होईल त्यांचे हे मात्र जाणवत होते.
तिथली परिस्थिती सिनेमात दाखवतात तशी अगदी, मोठे ५-६ खोल्यांचे घर पण तो राहत होता ते गुरांच्या गोठ्यात, का? याला उत्तर नाही म्हणजे मला माहित नाही. घरात एका बाजूला शेळ्या बांधलेल्या, तिथेच फ्रीज, वाशिंग मशीन बांधून ठेवलेले. न दवाखान्यात जाण्यासाठी केलेली टाळाटाळ, पैसे नाहीत म्हणून. काय समजायचे काळात नवते. घरात पोचवून आल्यावर भात पिठले करायचे तर तांदूळ घरात नाहीत. की परिस्थिती आहे, खरेच इतकी हलकी कि  .... मन अस्वस्थ. त्याला याची उत्तरे माहित नाहीत. का असे घडत होते? आता पुढे काय घडेल? त्या बाईला तिथे नीटपणे राहता येईल कि कसे तरी दिवस काढावे लागतील? काय घडेल? काय निर्णय घेतील सगळेजण. माझ्यावर आशीच वेळ आली तेव्हा मला नोकरी असल्याने बाकी निर्णय काही घ्यायचे नव्हते. ईथे सारी जबाबदारी कोण घेणार?भावाभावांचे पटत नव्हते पण आता तो जबाबदारी घेईल का? मुलांचे शिक्षण पार पडेल कि मधेच बंद होईल. मुलगा खूपच लहान आहे, त्याला नीटपणे सांभाळले जाईल का? कि काही वेगळे घडेल? जेवढा विचार करावा तेव्ह्डे डोके गरगरायला लागते आहे.
एकट्या बाईने दिवस निभावणे खरेच आवघड
आहे. काय घडणार काय माहित.
         बघता बघता काल सुरेशचा १० वा दिवस झाला, काळ कोणासाठी थांबत नाही हे खरे.पण.... या पण ला खरेच उत्तर आहे का?
         या १० दिवसात माझ्या कडे किती स्थित्यंतरे झाली, माझी मनस्थिती किती बदलेली आहे, मी आयुष्याला इतकी कांतले आहे कि सतत मनात मृत्यूचेच विचार घोळत असतात. आता आपणाची गरज कुणाला नाही हे सतत जाणवत राहणे फार आवघड आस्ते. मुलांच्या संसारात त्यांनी सामाऊन घेतले आस्ते तर इतकी १टी  पडले नसते पण सचिन कडे तर मला , मी जिवंत असले काय न नसले काय त्यांच्या लेखी सारखेच आहे जर मी गेले तर ते जास्त निवांत तरी होतील. म्हणून तर जास्त मी या विचार कडे झेपावते आहे. खरेच आत्तापासून प्लानिंग करून मी व्यवस्थित पणे हे साधू शकते. नितीन ला खरेच खूप वेईट  वाटेल पण किती ठरवूनही मी जास्त मनस्ताप नाही सहन करू शकत आता. या आठवड्यात जी.डी. बरोबर जाणार आहे तिच्या सरांकडे पाहू ते काय सांगतात ते. एक गोष्ट मात्र खरी कि मी निर्णयाच्या खूप जवळ जात आहे, न हा निर्णय घ्यायला लावणारी शिल्पा असेल याची जाणीव सार्यांना करून देऊन मग स्वतःला संपविण्याचा निर्णय घेईन. जे माझ्या आयुष्यात माझ्या वाट्याला आले ते इतरांच्या वाट्याला येण्या पासून वाचावे एवढीच इच्छा.ती तशी का वागली मला माहित नाही त्यात माझा काय दोष होता ते मला माहित नाही. कोणता राग तिने का न कसा काढला तिचे तिला माहित. मला मुला पासून तोधून तिने काय सध्या केले खरेच सचिन पूर्णपणे ती म्हणते तसा वागतो का? त्याच्या आयुष्यात नाही तरी तिचेच स्थान जवळचे असणार होते मग तिने मला माझ्या घरापासून तोडून काय साध्लेन. तिला कधी आशी वेळ येणार नाही का? तिच्या वाट्याला हे प्रसंग येणार नाहीत का? हे माझ्याच प्राक्तनात का? मी मुलांना सारे काही समजून राहिले म्हणून का? स्वतःचा विचार न करता सारे आयुष्य त्यांच्या साठी जगले म्हणून का? याचे उत्तर सचिन स्वतः तरी देऊ शकतो का? काय केले म्हणजे हा तिढा सुटेल? माझ्या मृत्यूने नक्की सुटणार at least माझ्या पुरता तरी हा प्रश्न सुटेल. खूप अस्वस्थ आहे बाकी कुणाला याची कल्पना नसेल . 

1 comment:

  1. बापरे! नक्की उलगडले नाही तरीही फार अस्वस्थ वाटले. काळजी घ्या.

    ReplyDelete