Sunday, June 27, 2010

२८/६/2010

आज सकाळी सकाळी खुप घाई झाली, सचिन चा फ़ोन आला न बोलता बोलता वेळ कसा संपला ते कळलेच नाही। चालायचेच। काल खुप टेंशन होते॰ , नितिन पण मृणाल वर चिडलेला न सचिन ने पण राजीनामा द्यायचा निर्णय घेतलेला। पण कालच किशोरशी बोलले न रीलाक्स झाले होते.मृणाल रविवारी येते आहे, न सचिन थाबंतो आहे थोड़े दिवस.चला काय होइल ते पाहण्या शिवाय माझ्या हातात काय आहे.मुले मोठी झाली त्यांचे ते निर्णय घेऊ लागली १ प्रकारे समाधान आहे पण आता मुलाना आपली गरज नहीं हे ही कुठे तरी मानत येते पण माला खरच नाही वाइट वाटत या गोष्टीचे। ते तेवढे सक्षम झाले म्हणजे मी निवांत झाले न? असे तर होणारच त्यांचा संसार चालू झाला की तेच निर्णय घेणार न, उलट त्यानीच निर्णय घेणे महत्वाचे आहे.जरा शांत पणे विचार केला की हे सरे पटायला लगते। मी आता बाजूला होणे च योग्य आहे.बस आज बस करते.

Wednesday, June 2, 2010

३/६/10

किती दिवसानी लिहिते आहे आज पण वेळ होत नहीं न जेव्हा वेळ आसतो तेव्हा लिहायला जमात नहीं आजही कही लिहायला लगे पर्यंत कोणी तरी येइल न लिहिणे तसेच राहिल असे होते बरेच वेळा आयुष्यात खुप वेळा आसा आनुभव येत आसतो की आपण ठरवतो काही न होते काही.काही का आसेना २ वाक्य तरी लिहायची ठरवूनही नाही जमले लिहायला अर्थात त्यालाही आपणच कारण आसतो, आगदी मनापासून ठरवले तर नक्की हे जमले आसते आपला आळशीपणा नडतो म्हणा न आसे किती तरी प्रसंग आसतात की आपण ठरवले आसते तर नक्की जमले आसते.पण त्या गोष्टीची तेव्हढ़ी निकड नहीं भासत माणसाला ज्याची निकड भासते ते माणूस जिव तोडून करतोच करतो हे लिहिणे पण तसे आहे त्या वाचून तसे कही बिघडत नाही हा जरा मनाला आस्वस्थ वाटते पण असे अस्वस्थपणा मनाआड़ टाकायची सवय झाली आहे। आली वेळ सपादुन न्यायची न चालायला लागायचे.पण आता बस फार वेळ नहीं चालणार हे, कुठे तरी आपल्या मनचा विचार करून त्या प्रमाणे चालायला पाहिजे.