Wednesday, March 31, 2010

१/४/10

आज १ एप्रिल पण दिवस खुप घाई गर्दीचा गेला सकाळी सचीन चा फ़ोन , मग परग्चा कही काम जहाले नहीं.नसला तर मूड मात्र ख़राब झाला खुप कही लिहायचे होते आज पण अत तो मूड नहीं घरी मी एकटी होते तसा कामाचा लोड कधीच नहीं वाटत माला पण बकी गोष्टींचे टेंशन येते.नहीं जमणार लिहायला, रात्री तर काय काय लिहायचे हे नुसते डोक्यात विचार चालू होते पण अत्ता लिहिताना पूर्ण blank असे का होते , विचार एकीकडे न मन दुस्र्या विचारत त्यामुळें कदाचित असे घडत आसवे। पण मनाला न विचराना एकत्र आणताना असेच होणार का? नहीं जमत आज काहीच सुचत नहीं आहे। काल काय लिहिणार हे ठरऊनही पूर्ण कोरी का होते ? चला आज एडिट करताना आपल्याला पाहिजे तो शब्द कसा लिहायचा ते समजले म्हणजे डोके जरा ताळयवर येते आहे म्हणायचे पण तरी आज बस नो मूड .

Monday, March 29, 2010

३०/३/10

ब्लॉग तयार करायला तर शिकले पण तो सजवायला शिकायचे आहे, खुप options आहेत पण निवांतपणे पाहिला पाहिजे खुप कही त्यात टाकता येते फोटो, block कोलोर काय काय करता येते पण निवांतपणे शिकेन सगले। सजवने खरच इतके महत्वाचे आसते का? तसे नुसतेच कोणी वाचणार नहीं का? मी कोणी वाचावे म्हणून नाहीच लिहित आहे पण माला स्वतहाला सुध्धा पाहताना छान वाटेल नक्कीच कोणतीही गोष्ट सजवून समोर अली तर खुप कही सुख देऊन जाते आपण पाहतो न की आई किती कैउतुकाने आपल्या मुलाला सजवते तिला त्या गोष्टीचा कन्ताला नहीं येत उलट वेगलाच आनंद मिलतो.तारुन्न्य आले की स्वताला सजवून जगाला सामोरे जाण्यात नक्कीच सुख आसते, आपल्याकडे कोणीतरी बघावे आसे वाटने म्हणजे तारुण्याची भूल पड़ने आसते .या भूलीतुनच आयुष्यात रामायण घडत आसते।त्यातूनच मने जुलातात प्रेम प्रकरणे घडतात न समोरच्याला bhulvinyasathi स्वतहाला सजवले जाते.प्रेम प्रक्रनत मूड कही वेगलाच आसतो, सगळी दुनिया एका बाजूला न आपले माणूस एका बाजूला.ती धुंदी कही वेगलीच आसते, त्यावेळी सगले जग आपल्यासाठी सजून सामोरे आले आहे आसे वाटत रहते। प्रेमाची पुर्तता लग्नात जाली की समोरच्याला आपल्यामधे aadkivinyasathi पुन्हा स्वताला सजवावे लगते, रोज कही तरी नविन दिसावे म्हणून प्रयत्न चालू राहतो.जन्मापासून सुरु जहालेले सजने चालूच राहते। नंतर आपण पण आजून तरुण आहोत हे दाखविण्यासाठी सज शृंगार केला जातो तुकरामानी म्हटले आहे की,"का रे भुललासी वरलिया सोंगा " तरी मानुस वरचा पापुद्र थापतच राहतो। त्यामुले बाहेरचे सैंदर्य खुलत आसेल कदाचित पण आंतरिक सुन्दरता कशी येणार.आपण कधी या गोष्टीचा विचार करतो का? लग्नाच्या बाजारात मुलगा मुलगी दिसण्या वरच लग्न ठरवतात न? सजने हा गुणधर्म नसता तर जग तरी सुन्दर दिसले आसते का? जगातले सगळी सुन्दरता आपण पहु शकतो, आनुभावु शकतो, कारण त्याला परमेश्वराने सजवून आपल्या पुढे ठेवली आहे म्हणून, रोजचा सूर्योदय वेगला, रोजचा सूर्यास्त वेगला , वाहणारी नदी, तिची सुन्दरता वेगळी म्हणून नाविन्य टिकून आहे। सजने हे जन्मा बरोबर सुरु होते ते, आयुष्य संपे पर्यंत चालू आसते, मेल्या नन्तर प्रेताला सुध्धा सजवले जाते। सजने, सज्वाने हे जगाच्या अंता पर्यंत राहणार आहे.तो शब्द आसा सजुनच सामोरा आला आहे न? आज बस आता.

Sunday, March 28, 2010

२९/३/2010

कल खुप वेळ नेट वर होते खुप कही वाचले, खुप कही शोधले, कही माहीत करून घ्यायचा प्रयत्न केला लिहित पण होते काल पण आज काय लिहायचे हा प्रश्न माला रोज पडतोच.लिहायला लागले की विचार सुचत जातात पण जनिवपुर्वक ठरवून कही लिहायचे तर माला नहीं जमणार.आज जीमेल वर फोटो पाहत होते खुप आठवणी जहाल्या त्या अमेरिकेच्या फोटो पाहत होते सगले आठवत गेले, पाहिलेला सूर्योदय, ग्रांड कैनियन] लोस एंजिल्स वेगास, पोर्टलैंड, न्यू यार्क, खुप छान होते ते सगले, इतके कही सुन्दर ठिकाणे पहिली की बस। आता पुन्हा ट्रिप ठरवते आहे, आमरनाथ, कश्मीर, वैष्ण्विदेवी पाहू काय काय पाहता येते ते.ठरवत तर खुप कही आहे, पुन्हा फोटो, पुन्हा समाधान, न पुन्हा नविन कही तरी ध्यास आसेच चालू राहणार आयुष्यात पण म्हणून तरी आयुष्य पुढे पुढे जात आहे, नसता मला तरी या रोजच्या रूटीन च कंठला आला आसता। आज बस इतकेच

२८/३/10

लिहिता लिहिता एडिट करायला गेले न सगलेच विसरून गेले , का असे होत आसवे जरा सवय व्हायला हावी या सगळ्या गोष्टीची मग आपोआप जमेल हे असे लिहिणे देखील.चला एडिट यात आस्ते हे समजले तरी निवांत वेळ पाहिजे खरे म्हणजे, कही तरी लिहायचे आहे पण मी काही कोणी खुप महान नहीं आहे की माला सरे जमेलच म्हणून पण "कोशिश करके देखना " आसे कोणी तरी म्हटले आहे न आपण तेवढेच करायचे नंतर बाकी सगळ्या दुरूस्त्या, लिहीणे खरे तर आवघड नहीं पण इंग्लिश मधून मराठी लिहायचे आवघड आहे। जमेल पण सावकाश .जमाय्लाच हवे , जगात कोणतीच आशी गोष्ट नहीं की जी impossible म्हणता येइल .आज खुप छान लिंक होती टेम्पलेट मधे ब्लॉग तयार करायची पण dusrya लिंक डिलीट करताना नेमकी ती डिलीट zali कशी ती शोधायची ते ही नहीं माहित माला मग पुन्हा येइल या भरवशावर बसणार आहे अली की सेव करून ठेवेन तर विसरने माणसाला जमते का? जनिवपुर्वक विसरायचे म्हणून ठरविले तर तेच सारखे आठवत रहते, असे का?याला उत्तर नहीं। माणूस गोष्टी विसरतो म्हणजे विस्मृतीत त्या गोष्टी जातात म्हणून ते विसरतो लहानपण माला आठवत नहीं कारण त्या गोष्टी खुप पूर्वी घडून गेलेल्या आसतात त्याही पेक्षा त्या गोष्टी लक्षात ठेवण्य इतका आपला मेंदू त्यावेळी devolop zalela नसतो म्हणून पण मोठेपणी जेव्हा आपण खुप गोष्टी प्रयत्नानी विस्मृतीत ढकलतो, तरीही त्या नको तेव्हा बरोबर आठवतात, असे का? याला उत्तर नहीं। विसरन्य सारखे माणसाला वरदान नहीं कारन काल काय घडले हे मी विसरते म्हणून नविन गोष्टी करू शकते जर ते जमले नसते तर मानसे आपली दुखे विसरलीच नसती दुखाच का सुख सुध्धा ख़ुपवेला विसरावे लगते नहीं तर नविन सुखला कशी काय जगा मिळणार? मान सन्मानाच्या सुखत जर aadkun राहिलो तर नविन कार्य करुन नविन सन्मान कसा काय मिलवनर न? तसेच जुनी मानसे विसरून म्हणजे त्याना लांब करून नहीं तर नविन माणूस jodnyasathi जून्या माणासना जरा लम्ब ठेवावेच लगते न? नाही तर नविन नाती कशी जोडली जायची माणसाला आयुशात सुख न दुखाही वाट्याला येतात , त्या दोन्हीलाही सामोरे जाण्यासाठी पहिली गोष्ट विसरली पाहिजेच न? त्यासाठी देवाने मनाला ज़ोपेचे वरदान दिले आहे, सरे विसरून माणूस पुढे पुढे जाऊ शकतो नसता तिथेच थांबला आस्ता न एखाद्या दबक्यासरखा संकुचित जाला आसता । तसा संकुचितपना संपवा म्हणून तरी मागचे सगले विसरून पुढे चालत राहिले पाहिजे .

Thursday, March 25, 2010

२६/३/10

काल रात्रि मधेच जाग आली , न विचार पुढे पुढे धावायला लागले, आत्ता ते कही आठवत देखिल नहीं, तो क्षण आसतो तेव्हाच जर लिहिले आसते तर ते विचार कुठेतरी सापडले आसते। चालायचेच आत्ता जे लिहिले शाक्य होएल ते लिहिन विचार , माणसाला विचार सुचत कसे आस्तील? कोठून येत आसेल ही शक्ति। जन्मलेले बाळ देखिल zopet हसताना नसता रडताना दिसते त्या जिवाला देखिल कही दिसत असेल नक्कीच मग हे विचार खरच मागच्या जन्माची देन म्हणायची की मागचे विचार तसेच या जनमत येतात काहीच समजत नहीं पण जो विचार मी करते ते दुस्र्या कुणाचे वेगलेच आसू शकतात असे का? व्यक्ति तितक्य प्रकृति म्हटले जाते ते का? हे कशावरून ठरत आसवे, कोण देत आसेल ही बुद्धी.बोलताना, लिहिताना माला जे विचार सुचतात ते कोण निर्माण करत असेल घरचे प्रश्न सोडवताना मी जी पद्धत वापरते टी माजी मुले सुद्धा नाहीत वापरणार हे का घडते, तसा विचार करायला माला मज़े नशीब घेउन जाते की विचार काहीच समजत नहीं हे सुद्धा फ़क्त आपण ठरवत जायचे। न संपणारी प्रश्नावली आहे ही। याची उत्तरे माला तरी नहीं सापडली फ़क्त जे जे होएल ते ते पहावे एवढेच आपल्या हातात आस्ते.याची जाणीव ठेवून आयुष्य जगायचे म्हणजे खुप गोष्टी सोप्या होऊं जातात.

Wednesday, March 24, 2010

२५/३/10

काल लिहायचे होते पण कंप्यूटर बंद होता न मग राहून गेले लिहायचे.आज लिहिते आहे खरे पण कालचा मूड कही वेगलाच होता.काय घडते आहे न मी न सचिन मधे आम्ही बोलता बोलता कधी भांडायला लागतो काळात नहीं, असे का होत असेल, का दुखावले जातो असे.मी माज्या आस्तित्वा साठी धड्पदते आहे का? काय तसे माला तरी जाणवत नहीं.मी स्पष्ट सांगितले आहे की मी नहीं रहू शकत त्यांच्या जवळ कुठे तरी कही तरी चुकते आहे पण माला असे जाणवते की तिथे मी नहीं नीट पणे रहू शकणार चला जाऊ देत कुठे न कसे रहायचे हे आपण ठरविले तरी देवाची काय एच्छा असेल ते नहीं सगता येत.अत्ता पर्यंत मी किती धड्पदले की जे माला वाटते ते आयुषत घडावे पण शेवटी जे देवाला, नशिबाला मान्य आसते तेच घडत असते तरीही आपण किती बढाया मारतो न की मी हे करेन ते करेन किती वेळा तरी आनुभव घेउनही माणसाचा आहम जात नाहीच शेवटी नसता मी कुठे राहणार हे मी का ठरवत राहिले आसते.जाऊ देत यातून तरी कही शिकता येते का ते पहिन, नक्की विचार करेन या गोष्टीचा.माजी काहीच तक्रार नहीं या बाबतीत, जे वाट्याला येते ते बस स्विकरयचे नहीं तरी आपण काय करू शकतो या बाबतीत आयुषत जे समोर आले ते मुकत्यानी स्विकरलेच न? ते सहन करायची तकाद त्या नियंत्या कड़े मागायची बस तू जे देशील ते शांतपणे सहन करायची तकाद दे म्हणायचे, चालायला लागायचे.

Tuesday, March 23, 2010

२३/३/10

आज या कंप्यूटर वर खुप दिवसाने ओपन जाले आहे (खाते) का ओपन होत नव्हते तस नव्हते समजत पण आता लिहिता येइल खुप आठवणी मनात आसतात त्यातल्या कही इतक्य अचानक आठवतात की आपण कधीच तय विसरून गेलेल्या आसतो आजही असेच zale सहज आकाशात रात्रि चांदण्या चमकताना दिसत होत्या लाइट गेलेले अन saglikade अंधारच आंधर होता ग्यालरित zopalyavar बसलेले आसताना आकाशात चक्क चांदण्या चमकत होत्या सप्तर्षि स्पष्ट दिसत होते मग आठवली टी सोलापुर्ची गच्ची तिथून zople की आकाशात सगले तारे चमकताना स्पष्ट दिसायचे, मुलांशी गप्पा मारताना तारे दाखवत त्यांची नवे सांगत , त्यावरच्या गोष्टी सांगत zopun जायचो। आता पुण्यत पूर्ण आकाश कधी दिसतच नहीं एखादा टुकड़ा दिसतो न त्यातील दिसतील तेव्ह्ध्याच चांदण्या बघायच्या , त्यात polution mule तारे दिसणे आलभ्य लाभच म्हणायचा पण कल सप्तर्षि चांगले दिसत होते मग तो कल आठवला मुलाना गोष्टी सांगता सांगता येणारी zop आठवली कल किती भरभरा संपतो उद्या मुलांना मुले होतील तेहि आशच गोष्टी संगतील पण तेव्हा सपतरुशी, विंचू, शनि, मंगल, रोहिणी व्याध एकाच वेळी दिसतील? एक सप्तर्षि नि केवढा भुतकलाचा न भाविशाचा ही फेरफटका मारून आणला या आशाच आठवणी , तो काळ ते संभाषण, तो स्पर्ष, गोष्टी एईक्तानाचे हुंकार न विचारलेले प्रश्न sagle तसेच्या तसे जाणवत होते मुलाना कदाचित ते आठवणार नहीं, मी ही गोष्ट सारे इथे पुण्यत येउन विसरून गेले होते मज्यासठी तो काळ सुखाचा होता, सोबत नहीं mhannar पण मुलांची साथ होती, त्याना आई म्हणजे त्यांचे जग होते सगले सांगायचे ते आईला मागायचे ते आईला तिथे सगल्या प्रश्नाची उत्तरे आसनार हा विश्वस होता , बघता बघता त्यांच्यात विश्वास निर्माण jala न आईचा हात कधी सुटला ते कुणालाच समजले नहीं। हात सुटला, आत्मविश्वास आला ही खुप चांगली गोष्ट त्यासाठी तर जगले मी पण तरीही तो काळ फ़क्त आठवणीत राहिला ही हुरहुर कुठेतरी आहेच कालच्या सप्तर्षि नि हुरहुर जागवली चालायचेच, कालाचा महिमा म्हणायचे न विसरून जायचे नविन कही तरी aathvnyasathi.

Sunday, March 21, 2010

२२/३/10

परवा लिहिलेले शोधत आहे पण सापडत नहीं तय दिवशी आर्धावट राहिले होते पण जावू देत नविन लिहावे आज तेच जास्त चांगले। काय चांगले हे माणसाला चांगले समजत आस्ते। स्वताहाचे चांगले तर लगेच जाणवते, त्याप्रमाणे वागण्याचा मानुस प्रयत्न करतो पण कधी कधी एखाया ठिकाणी समजुन सुधा मानुस दूसरी कड़े ओढला जातो, कही तरी रुनौबंध आसतात की ते त्यावेळी घडून जाते। कितेकदा त्याचा परिणाम आयुशावर होतो चांगल्या vaetachi जान आसुनही चंग्ल्याची सांगत सुटते असे का घडते ते नहीं सांगता येत, कदाचित त्याला प्रारब्ध म्हणत आसवेत तसे एकासाठी चांगले ते नेमके दुसर्यासाठी आपशाकुनी आसू शकते आसे का याला उत्तर नहीं उद्या काय घडणार हे माहित नसूनही आपण आयुष्याचे plan करतोच न? ते पूर्ण व्हावेत म्हणून धडपद्तोच न? तरीही कुठेतरी का हे प्रश्न मनात आस्तातच हे न संपणारे प्रश्न zop उडवतात कधी कधी मनाला चांगले वाटणारे जगाला नहीं वाटत की ते चांगले आहे मग पटते ते करायचे की जगरहती ती स्विकारायची हा मोठा प्रश्नच आसतो असे किती तरी न सुटलेले प्रश्न बरोबर घेउनच आपण जगत असतो, त्याची उत्तरे माहित नसतात, कितेकदा माहित असुनही त्याकडे काना डोला केला जातो हा स्वाभाव बनू शकतो पण त्यावर उपाय काहीच नसतो। रोज रोज आवडनारे जेवण सुधया आरोग्यासाठी रोज खाणे नहीं चांगले ठरत मग कितीतरी निर्बंध असलेल्या गोष्टी काढून टाकाव्या लागतातच खुप लिहायचे पण आज बस इतकेच। पुन्हा केव्हा तरी

Tuesday, March 16, 2010

१७/३/10

आज पाहत होते की काय काय करता येते ते पण तसे माला जरा आवघड जात आहे , मी बारह डाउनलोड केले पण माला कही जमेना की कसे लिहावे त्यात काना मात्र नहीं सापडत आहे पण तिथे जाता तरी आले जमेल haluहलुं आज जमेल वर लिहू का? आयुष्यात खुप गोष्टी जमवाव्यa लागतात १ ली गोष्ट म्हणजे स्वताला सावरून २ र्याला समजुन घेणे आपले विचार vegle असतात समोरच्याचे vegle जे माला म्हणायचे नेमके त्याच्या विरुध २रा म्हणत असातो पण त्याला समजुन घेणे जमले पाहिजे हे जमवता जमवता लहानपण संपून जाते शालेय जीवन माजे खरे म्हणता म्हणता संपते तिथे विचार पक्के नास्तात ते तसे होता होता carrier चा विचार आसतो पाहिजे ते carrier फार थोड्या लोकांच्या वाट्याला येते बरेच जानना जे वाट्याला येते ते carrier निवडावे लगते। खुप वेला परिस्थिति आशी असते की समोर दिसणारे carrier मुकाट्याने स्विकरावे लगते मग ते carrier जमवता जमवता निम्मी तकाद संपून जाते त्यातच जोदीदाराची ओढ़ लागली की आयुष्य अनखिंच adjustकरवे लगते। स्विकरलेला जोड़ीदार समजुतदार आसेल तर फारसे प्रॉब्लम नहीं येत पण तसे नसेल तेर सार कही आपल्याला जमववे लागते। असे जमवता जमवता आपण आयुशाचे रंगवलेले चित्र पर बदलून जाते जेंव तय चित्रावर नजर टाकतो tenva ते आपण ठरविल्या पेक्षा किती वेगले ज़ालेले आसते। अक्षरशः माणसाचा माकड ज़ालेले आसते। पण त्याला कही इलाज नसतो। आपल्या हातात फ़क्त चलने आसते रास्ता २ र्यनेच ठर्विलेला असतो त्याला कदाचित नियति म्हणत असतील । असे जमवता जमवता सारी ताकद संपते १ क्षण आसा येतो की विचार करायचेच विसरले जाते काहीही न ठरवता तय नियतीच्या हातात आपले तरु दिले जाते , हे बरोबर की चुक हे नहीं ठरवता येत पण मन तितके उद्विग्न होऊं जाते। आज इतकेच बस लिहिन पुन्हा कधीतरी असेच निवांतपणे

Monday, March 15, 2010

मी ही लिंक धोंडोपंत उवाच या ब्लॉग वरुण घेतली आहे कारन मेधा टी वाचेल न माला wwwbaraha.कॉम कसे लोड करायचे ते सांगेल न माला direct मराठीत लिहिता येइल। Dhondopant uvach ha blog vach , Medha bhanat ahe, pakka kokni. me aaj baki kahi nahi lihit pan mag ligita yeil tasa barach vel ahe n mukhya mhanje manapasun lihave ase vatlya shivay lihine hot nahi. tyamule he fakt Medhasathi, malahi ang kase down load karayche mag sahaj marathit lihita yeil aplyala. Navin varshachya Shubhecha tula n Javai bapu na. Navin varshat navin pahunyachi navin batmi denar na?
॥ श्री स्वामी समर्थ॥
लोकहो,
देवनागरीत टंकलेखन करण्यासाठी काय करावे? असा प्रश्न काही लोकांनी मागील लेखावर विचारला.
कुणी इतर संस्थळांवर जाऊन, तिथे टंकन करून, मग तो मजकूर आवश्यक त्या ठिकाणी चिकटवतात.
असे करण्याची अजिबात आवश्यकता नाही.
मराठीत ( देवनागरीत) लिहिण्यासाठी www.baraha.com येथून संगणकप्रणाली उतरवून घ्यावी. ती आपल्या संगणकावर जतन करावी आणि सरळ लेखन सुरू करावे.
इतर भारतीय भाषांसाठीही म्हणजे कन्नड, तामीळ, तुळू, मल्ल्याळम, पंजाबी, गुजराती, बंगाली, ओरिया या भारतीय भाषांसाठीही त्याचा वापर करता येतो.
बारहा वापरतांना कुठलाही मजकूर कॉपी / पेस्ट करत बसण्याची गरज नाही. बारहा सुरू करून, त्यात MA unc म्हणजे मराठी युनिकोड हा पर्याय निवडून,.......... " हाण तुझ्याऽऽऽऽयला"....... अशी सणसणीत मराठमोळी शिवी हासडून, सरळ कळफलक (की बोर्ड) बडवायला सुरूवात करावी.
त्यामुळे बारहा वापरा. मातृभाषेतच लिहा. मराठीचा मळा फुलवा.आपला,
(आग्रही) धोंडोपंत

Sunday, March 14, 2010

१५/३/10

उदया गुढी पाडवा मराठी नविन वर्षा , सगळ्याना subhecha दिल्या की बारे वाटेल आज कही संकल्प करायचे तर कही ठरवले नहीं मेधाचा मस्त मेल आला तशी आज बरीच सावरली आहे, एकतेपाना कधी तरी जाणवतो पण असे उदास फार थोड़े वेळा होते। कोणतीही नविन गोष्ट मानत उत्साह निर्माण करते तसेच नविन वर्षा ही बरेच कही संकल्प केले जातात,पुर्ण न ज़ालेल्या संकल्पंची रुख रुख टोचत असते। मानत घर करूँ बसलेले संकल्प मनातून बाहेर नाहीत जात जाशी आवडती गोष्ट पण तरी ते संकल्प नाहीत पुर्ण होत चालायचेच यालाच जीवन म्हणत असतील आर्धि मुर्धि स्वप्ना गोला करायची न नविन स्वप्नामागे धावायाचे। तसेच १ स्वप्ना की नविन वर्षा आपल्यासाठी कही तरी नविन घेउन येइल पण ५२ वर्षा ज़ल्यावर ते ही जुने होउन जाते मनातली उदासी संपली तर हे सारे संपेल तर ही संपवु या।
नविन वर्षाच्या मनापासून Shubhechcha

Wednesday, March 10, 2010

11/3/10

रोज कही तरी लिहायचे , पण के लिहिणार न? लिहिणे, खरेच असे लिहित गेले की लिखाण जमेल का? हो प्रयत्न तेर केला पाहिजे, मजा ब्लॉग कोणी वाचावा असे नहीं मी लिहिते ते माज्या स्वता साठी। लिहिताना फोचार सुचत जातात, budhi कम करायला लगते। मग विचार positive कसे बनवायचे ते जमायला लगते। अनेक courses आहेत की जे आपले विचार positive करण्यासाठी धडपडत आसतात पण तो विचार अपनच positive बनवायला हवा न? त्यासाठी खुप मनाची तयारी करावी लगते। माज्या सारख्या एकट्य व्यक्तीला तर मनाशी खुप zagdave लगते पण इलाज नहीं स्वतहाला जगात आहे ते आयुष्य समधानानी जगायचे तर हे केलेच पाहिजे। त्यासाठी लिहिणे हे माला तरी फार गरजेचे वाटत गेले कारन माला नहीं कोणाशी आपले मन मोकले करता येत, आगदी मुलं जवळ सुद्या मग असे लिहायचे आपल्या भावनाना वाट करूँ द्यायची अन येणार्य नव्या क्षनाना सामोरे जायचे त्यामुले लिखाण हे मज्यासठी must आहे । लिहायचे न सारे असे only mine म्हणून जतन करायचे । कोणी वाचावे म्हणून नाहीच आहे हे तर स्वतहाला कुठे तरी expose करावे .