Monday, August 9, 2010

१०/८/10

आजकल मी खडकीला उतरून बस ने विश्रन्तवाङी ला येते काल खडकी स्टेशन वरून रास्ता क़ॅस करत होते कुठल्या धुंदीत होते माहित नहीं पूर्ण रास्ता पार केला पण शेवटी असे वाटले की येणारा गाड़ीवाला माझ्या मागून गाड़ी घेउन जाईल पण तो थेट अंगावरच आला की, सगळे ओरडले रस्त्या वरचे। कसे न किती गोष्टी आपण गृहीत धरतो न? हे असे गृहीत धर्णेच खुप वेळा चुकीचे ठरते त्यापेक्षा स्पष्टपणे काही गोष्टी बोलल्या किंवा एकमेकाना सांगितल्या तर जास्त चांगले होत असेल असे वाटते॰ रोजच्या आयुषात आपण आपल्या बरोबर काम करणारी मणसे आसोत वा सोबत राहणारी न बोलता तुम्ही आसे कराल असे वाटले होते असे सहजपणानी म्हणून जातो पण खुप वेळा या गोष्टी चुकीच्या निघू शकतात॰ नवरा बायको , आई वडिल , बहिण भाऊ, मित्र असे किती तरी जण असतात की न बोलता त्यांच्या कडून अपेक्षा मात्र करत आसतो, पण हेच जर तोंडाने बोलून सांगितले तर किती तरी समज गैरसमज कमी होतील न॰ आज इतकेच बस.

No comments:

Post a Comment