Tuesday, April 6, 2010

७/४/10

आज सकाळी चालत येताना दोन लहान मुले एकमेकाच्या गळ्यात गळा घालून रस्त्याने जात होते मस्त त्यांच्या त्यांच्या विश्वात रममाण झालेले कशाकडे लक्ष नव्हते मला माझे लहानपण आठवले, किती मस्त काळ आसतो न तो, मैत्रिणीशी भंआड़ायाचे तरी सकाळ झाली की तिची आठवण येणारच, मग कही तरी कारण काढून तिच्याकडे जयाचे, ती ही आपल्या सारखीच आस्वस्थ झालेली आसयची एक्मेकीना पाहिले की कालचे भांडण विसरले जायचे न एक्मेकीची ओढ़ जास्त जाणवायची ते दिवस वेग्ळेच होते, आभ्यासाचे बर्डन नव्हते, बस पास होताहेत न मुले आसे म्हटले जायचे। खेळायसाठी घराला आंगन आसायचे न आई वडीलाना कही बोलायचे आसले की आमची रवानगी अज्जाद त्या आंगणात खेळायला व्हायची मी तर सगळे खेळ खेळायची आगदी गोट्या, आंब्याच्या कोई, चोर पोलिस, डबा येसपैस, कसा वेळ संपायचा हे समजायचे नहीं माझ्या आयुषात मी आभ्यासा साठी कधी नहीं मर खाल्ला पण खेळून घरी ऊशीरा आले म्हणून खुपदा शिक्षा भोगली आहे.आज त्या दोन मुलाना पाहिले न ते दिवस आठवले, कही काळ का होईना सरे टेंशन विसरून त्या क्षणात जाऊन पोहचले.त्यानंतर खुप जबाबदार्या कदाचित आयुषात येणार आसतील म्हणून तो तसा बिनधास्त काळ वाट्याला आला असावा.

No comments:

Post a Comment