Sunday, April 4, 2010

५/४/10

माझ्या लग्नाची गोष्ट

तसे लग्न म्हटले की नविन साडी, सजलेल्या बायका, शेहनाई, धावपळ, जेवणाचा एक खास वास. माझ्या लग्नात आसे काहीच नव्हते। धावपळ होती पण ती नवरा नवरीची॰ कारण होस्ट पण आम्हीच, न ऊत्सः मूर्ति पण आम्हीच। लग्नाला जेवणासाठी एकुण २५ माणसे आसतील आशी यादी ठरलेली। दोघांचा मिळून महिन्याचा जमलेला पगार ९००रु न मागची शिल्लक ४०० रु। एकुण १२०० रु॰ लग्न करायचे ठरलेले॰ त्यात ३५० रु मंगलसूत्र १००रु साडी, ५० रु च शर्ट, न मग महिना भारसठी म्हणून भरलेले सामान दबामी करायचा म्हणून रव्याचे लाडू केलेले, भात सम्भार केलेला, न मी पोळ्या लटत बसलेली बाहेर धुल्लाप्पा म्हणून यांचा मित्र त्याची गड़बड़ चाललेली, गोरज मुहुर्तावर लग्न लावायचे ठरलेले। आमचे घर होते बन्दोरवाला लेप्रोसी हॉस्पिटल मधेच दोन खोल्या, नेमके परदेशी पाहुणे आलेले त्या दिवशी त्याना लग्नासाठी दोन तासांची सुट्टी मिळालेली मग मुहुर्त गाठ्ण्यासाठी धडपड.नवर्या मुलीला बोलवा म्हणून आवाज आलेला न माझी तव्यावर शेवटची पोळी चाललेली, ससुबैअना पोळ्या करता येत नव्हत्या। आजुन तोंड धूऊन साड़ी बदलायची होती आवरायचे होते, मेंदी etc.काहीच नव्हते कशी बाशी साड़ी नेसली, सगळे आवरले न आमचे लग्न लागले.त्यानंतर जेवणाची घाई पण जेवान वाढणार कोण? पुन्हा पार्ट बदलला नवरा नवरी वढ़पी झाले .दोन पंक्ति झाल्या न परदेशी पव्हणे ऑफिस ला भेट द्यायला आल्याने नवर्याने वरमाला काढून ठेवलीच होती त्या नविन शर्ट वर एप्रन चढवला न कामाला धवला नवरी बाकीचे पहु लागली, आलेले पव्हणे त्याना या म्हांणणे, जेवायला पांगत मांडणे, जेवायला वाढ़णे चालू होते.माझ्या माहेरची माणसे म्हणजे म्हणजे मामा, मामी, मावशी लग्नाला आले होते पण ते लेप्रोसी हॉस्पिटल न जेवायला फ़क्त माजे दोन मामच बसले त्यानी मामाची आश्तापुत्रा साड़ी आणली होती छान होती साड़ी पण त्यानाही परत जयाचे होते मी तर नवर्याच्या घरी काल पासूनच आले होते न, नो पाठवणी, नो रड़ने माहेरची मानसे आली दोन घास खाऊन निघून गेली। आता त्या होस्पिटलच्या सहेबाचे लग्न न तेहि तिथेच कम करणार्य मैडम बरोबर मग शुभेच्छा देण्यासाठी रांग लागली आनपेक्षित पणे कैतुकाने ते कुष्ठरोगी भेटायला येत होते.न त्यांचे लड़के साहेब त्याना जेवणार का विचारताच ते बिचारे जेवायला बसत होते। १५० रुग्नाचा वार्ड तो, न प्रतेकला साहेब म्हणजे जिव की प्राण.स्वायपक केलेला २५ माणसांचा येणार्याला जेव म्हाणणरा मझा नवरा मोठ्या मनाचा पण आम्हा सासु सुनांची कोण धावपळ सगळ्याना भात आमटी तरी पानात वाढायला पाहिजे न? लग्नाचे लाडू पहिल्या दोन पंक्तित्च संपलेले। धकते दिर, त्यांचा माला न समजणाजरे तमिळ मधे बडबड आसलेले, शेवटी कंटाळून जेवायला बसलेले माझा नवरा येणार्य प्रतेकला जेवायला घालत आसलेला न मी मिहिन्य भरसठी भरलेले रेशन एक दिवसात संपवून मोकळी झालेले कसे बसे रात्रि ९ वाजता सरे ऊरकले.आम्ही कोणालाही आमंत्रण दिलेले नव्हते पण लग्नासाठी स्वयं स्फुर्तिने आलेल्या त्या जिवाना लग्नाचे जेवण देणारा माझा नवरा मोठ्या मनचा पण लगनतली गम्मत वाट्याला आलीच नहीं, घास भरवणे नहीं, ऊखाणा नहीं, बस रांधा, वाढा न ऊष्टि काढ़ा एकदाचे सारे संपले, जरासा श्वास टाकला न पोटातल्या भुकेनी जाणीव दिली सगल्याना जेवायला घालून जे शिल्लक राहिले होते ते घेउन सासुबाई शेजारच्या दादान आई म्हणायचो आम्ही त्यांचाकडे जेवायला गेल्या आम्ही दोघे तसेच घरात शिल्लक कही नव्हते, काही नविन करण्याची तकाद नव्हति कोणाला कही म्हाणता येत नवते, मझा नवरा चुकला होता न, २५ मनसे म्हाणता म्हाणता त्याने २०० मनसे जेवायला घातली होती न मी त्याला साथ दिली होती न? जरा शोधा शोध केल्यावर एक डब्यात कालची भाकरी न भात भरून ठेवलेला daba सापडला, tondi लावायला लोणचे होते बस तो दबा तसाच दोघंमधे ठेवला न आमची लग्नाची पंगत जेवायला बसली माहेरचे कोणी नव्तेच न सासरचे सगले रुसलेले एकमेकाना तोच घास भार्व्ला , आता अशीच साथ दोघाना द्यायची होती पण टी शिली पोली न भात सुधया तय दिवशी खुप गोद वाटला बहुला बहुलिच्या लगनत सुधया बहुला बहुली ला जरा मन आसतो पण इथे सारेच ऊर्फाते होते स्वथाचे स्वता ठरवले होते न सरे दुसर्या दिवशी ऑफिस स्टाफ ला जेवण न रजिस्टर लग्न होते त्याची तयारी आशी नवति सगले होटल मधे ठरवले होते पण आता मामने घेतलेली सदी दूसरा दिवस साजरी करायला होती, तेवा आत्ता सारखे फल पिको पाहिजेच न मचिंग ही पाहिजे आसे नवते टी सदी पन्ध्र्य पोल्क्यावर नेस्ले, न सह्या केल्या। आता मात्र सगले जेवायला होटल मधे गेलो पण असे तट सज्वाने वगारे कही नहीं नोर्मल जेवलो नहीं म्हणायला ऊखाना जाला न एक लग्नाची गोष्ट संपली, ३० वर्षा जाली या घटनेला, पण आजुनही तो स्टोव तो कुकर न दिराची बडबड लोकांची भेटायची घी तशीच आठवते। लग्न तसे ८ वर्षच राहिले, सची (कृष्ण) छे वडिल वरले एक्सिडेंट मधे पण आठवणी तश्याच राहिला, कोणाला सांगितले तर विश्वास नहीं बसणार आशा.

2 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. काकू,
    खुपच विस्मयकारक आहे तुमच्या लग्नाची गोष्ट... नवरीच जेवण करून वाढते आहे ही गोष्टच खुप विलक्षण आहे... आणि लग्न करून काका चक्क ऑफिस ल़ा गेले तेहि.. २५ माणसांचा स्वयंपाक केल्यावरही २०० माणसे जेवली आनंदाने.. तुम्ही खरच 'अन्नपूर्णा' आहात... त्यादिवाशीच्या अन्नदानाचे पुण्याच तुम्हाला आता गोड फले देत आहे..
    काकांचे जाणे... आणि तेहि इतक्या अकाली.खुपच दुर्दैवाचे होते पण त्यांच्या मागे कृष्णा आणि नितिन च्या मागे ठामपणे उभे राहून .. सगळे एकटीने यशस्वीपणे निभावुन नेवून जे तुम्ही करून दाखवले आहे त्याला खरच तोड़ नाही.. कृष्णा म्हानतोच क 'आमची आई ना एकदम danger आहे ह...' खरच hatts off to you...

    ReplyDelete